Lokmat Sakhi >Food > पुऱ्या खूप तेलकट होतात? ३ टिप्स, कमी तेलात होतील कुरकुरीत, टम्म फुगलेल्या पुऱ्या

पुऱ्या खूप तेलकट होतात? ३ टिप्स, कमी तेलात होतील कुरकुरीत, टम्म फुगलेल्या पुऱ्या

How to Make Less Oily Puri :  पुऱ्या बनवण्यासाठी भरपूर तेलाचा वापर केला जातो. जास्त तेलकट पदार्था खाल्ल्यानं खोकला, कफ होण्याची शक्यता असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 03:08 PM2023-05-03T15:08:40+5:302023-05-04T14:53:01+5:30

How to Make Less Oily Puri :  पुऱ्या बनवण्यासाठी भरपूर तेलाचा वापर केला जातो. जास्त तेलकट पदार्था खाल्ल्यानं खोकला, कफ होण्याची शक्यता असते.

How to Make Less Oily Puri : How to make Perfect Oil free Puffed Poori | पुऱ्या खूप तेलकट होतात? ३ टिप्स, कमी तेलात होतील कुरकुरीत, टम्म फुगलेल्या पुऱ्या

पुऱ्या खूप तेलकट होतात? ३ टिप्स, कमी तेलात होतील कुरकुरीत, टम्म फुगलेल्या पुऱ्या

भारतीय अन्नपदार्थांमध्ये बरीच विविधता आढळून येते. ज्या गव्हाच्या पीठाच्या चपात्या आपण रोजच्या जेवणात खातो. (Cooking Hacks) त्या पिठापासून भारताच्या वेगवगळ्या भागात विविध पुऱ्या बनवल्या जातात. रोज चपात्या खाऊन कंटाळा आला की गव्हाच्या पीठात मैदा, रवा मिसळून पुऱ्या बनवल्या जातात. (How to make less oily puri)

काहीजण चहाबरोबर चिप्स, पकोडे, मठरी, पराठे, पुऱ्या खातात.  पुऱ्या बनवण्यासाठी भरपूर तेलाचा वापर केला जातो. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यानं खोकला, कफ होण्याची शक्यता असते. कमी तेल पिणाऱ्या पुऱ्या बनवण्यासाठी शेफ पंकज भदौरिया यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. (How to make Perfect Oil free Puffed Poori)

पीठ जास्त सैल मळू नये

पुऱ्याचं पीठ जास्त सैल असू नये. जास्त पातळ किंवा मऊ पीठ असेल  पुऱ्यांमध्ये तेल शिरतं आणि त्या व्यवस्थित फुगत नाहीत. म्हणून पुऱ्याचं पीठ मळताना कमीत कमी पाण्याचा वापर करा.  पीठ मिळताना तुम्ही त्यात मैदाही घालू शकतात. यामुळे परफेक्ट पीठ मळलं जाईल.

कणीक जास्तवेळ ठेवू नका

चपाती करताना आपण काहीवेळा मळलेली कणीक तशीच ठेवतो. पण पुरी करताना गव्हाची कणीक जास्तवेळ तशीच ठेवू नका. कारण त्यामुळे पीठ सैलसर होतं. अशा पीठात जास्त तेल शिरण्याची शक्यता असते. म्हणूनच तुम्ही ५ मिनिटांच्या आत पुरी बनवायला सुरूवात करा. जेणेकरून जास्त तेल पुरीत शिरणार नाही आणि पुरी क्रिस्पी बनेल.

३० सेकंदात दूध का दूध पानी का पानी: १ ट्रिक, शुद्ध अन् भेसळयुक्त दूधाचा फरक लगेच कळेल

तेलाच्या तापमानाकडे लक्ष द्या

पुरी तळताना तेलाच्या तापमानाकडे लक्ष देणंही तितकंच महत्वाचं आहे. तेल जास्त गार किंवा जास्त गरम नसावं. तेल गार असेल तर पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात.  तर तुम्ही तेल जास्त तापवलं तर पुरीच्या वरचा भाग काळा पडू शकतो आणि पुऱ्या आतून कच्च्या राहतील म्हणून मध्यम आचेवर पुरी तळा.

योग्य तेलाची निवड

पुरी तळताना योग्य तेलाची निवड करणंसुद्धा गरजेचं असतं. जर तुम्ही  चांगल्या तेलाची निवड केली नाही तर ते अतिरिक्त तेल पुऱ्यांमध्ये जमा होईल.  सोयाबीन तेल, मोहोरीचं तेलसुद्धा वापरलं जाऊ शकतं. 

Web Title: How to Make Less Oily Puri : How to make Perfect Oil free Puffed Poori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.