बऱ्याचदा आपण लिंबाच्या लोणच्याचा खार खातो आणि फोडी मात्र टाकून देतो. पण असं म्हणतात की लिंबाच्या रसापेक्षाही जास्त पोषणमूल्ये लिंबाच्या सालींमध्ये असतात. पण बरेच जण कडवट लागतात म्हणून लिंबाच्या फोडी टाकून देतात. तुमच्या घरी ही असंच होत असेल तर लिंबाची ही चटपटीत चटणी (How to make limbu chutney?) करून बघा. सालींसकट लिंबू खाण्याचे फायदे या पदार्थातून नक्कीच मिळतात. लहान मुलेही चटणी आवडीने खातील. शिवाय करायलाही सोपी आहे (Easy and instant recipe of lemon chutney). आजारी व्यक्तींच्या तोंडाला चव नसते. अशावेळी ही चटणी दिल्यास चवही बदलेल आणि आरोग्यासाठीही लाभदायक ठरेल.
लिंबाची चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य
आठ ते दहा लिंबू
अर्धी वाटी साखर किंवा गूळ
आलिया- करीनाची फिटनेस ट्रेनर सांगतेय एन्झायटी कमी करण्याचा खास उपाय, मनावरचा ताण होईल कमी
३ ते ४ टीस्पून जिरे
चवीनुसार तिखट आणि मीठ
लिंबाची चटणी करण्याची रेसिपी
१. सगळ्यात आधी एकेका लिंबाच्या ४ किंवा ८ फोडी करून घ्या.
२. यानंतर सगळ्या फोडींमधून लिंबाच्या बिया काढून टाका. अगदी एकही बी आपल्या चटणीमध्ये असायला नको. चटणीमध्ये बिया राहिल्या तर तिला कडवटपणा येतो. त्यामुळे बिया अगदी बारीक लक्ष देऊन काढून टाका.
३. नंतर चिरलेल्या फोडी आणि जिरे मिक्सरमधून एकत्रितपणे बारीक फिरवून घ्या.
अ-ब-ब! चहापेक्षा किटली महाग पण किती? २४ कोटी रुपयांच्या चहाच्या किटलीतून चहा पितं तरी कोण?
४. हे मिश्रण आता एका भांड्यात काढा. लिंबाचा गर जेवढा असेल तेवढीच त्यात साखर घाला. साखरेऐवजी गूळाची पावडरही वापरू शकता. जेणेकरून चटणीची पोषणमूल्ये आणखी वाढतील.
५. आता चवीनुसार तिखट आणि मीठ घाला. सगळी चटणी व्यवस्थित हलवून घ्या आणि काचेच्या बरणीत भरून ठेवा.
हे देखील लक्षात ठेवा
ही चटणी तुम्ही लगेचच खाऊ शकता. पण तिला व्यवस्थित मुरायला आणि चव यायला २ ते ३ दिवस लागतात. त्यानंतर चटणीत अजिबातच कडवटपणा राहत नाही, शिवाय चवही खूप छान लागते.
मान- पाठ आखडून गेली? अंग जड पडले? १ योगासन करा, सांधे होतील मोकळे
अशी ही आंबट- गोड चटणी जेवणात तोंडी लावायला किंवा पराठा, पोळीसोबत खायला छान लागते. आवडत असल्यास गरजेपुरती थोडी चटणी वाटीमध्ये काढून तिला जशी पाहिजे तशी फोडणी घालूनही खाऊ शकता. शिवाय उपवासालासुद्धा ही चटणी चालते.