Join us  

ना पीठ मळायची झंझट ना पोळ्या लाटायची, करा गव्हाच्या पिठाचे झटपट धिरडे! चपातीला उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 6:07 PM

How To Make Liquid Dough Roti | No Kneading No Rolling रोज - रोज चपाती खाऊन कंटाळा आला तर हा झटपट धिरडे पर्याय आहेच भाजीपोळीसारखाच पोटभरीचा

चपाती, पोळी, रोटी या तिन्ही नावाने प्रसिद्ध असलेला हा पदार्थ भारतात प्रचंड फेमस आहे. चपाती आपण भाजी, श्रीखंड, तूप, अथवा चटणीसह खातो. चपाती जर गरमा - गरम असेल तर ती नुसतीही छान लागते. चपाती मऊ - लुसलुशीत बनवण्यासाठी त्याचे पीठ नीट मळता आले पाहिजे. चपाती नीट लाटताही आली पाहिजे.

चपाती बनवणे सुरुवातीला खरंतर अवघड जाते , परंतु हळू हळू शिकल्यानंतर चपाती गोल टम्म फुगलेली बनवता येते. अनेकांना चपातीचे पीठ मळायला व लाटायला कंटाळा येतो. व काहीवेळेला चपाती खाऊनही कंटाळा येतो. पण भाजीसोबत चपातीसारखंच काही हवं असतं. त्यासाठी हा सोपा उपाय. एक कप गव्हाच्या पिठाचे करा झटपट धिरडे. ना लाटायची झंझट ना भाजायची(How To Make Liquid Dough Roti | No Kneading No Rolling).

गव्हाच्या पिठाचे धिरडे

एक कप गव्हाचं पीठ 

पाव कप रवा

मीठ 

पाणी 

आलं लसूण पेस्ट

पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावन, मऊ लुसलुशीत घावनांची मजाच न्यारी..

मोहरी 

जिरं

कडीपत्ता

हिंग

कांदा 

कोबी 

टोमॅटो

तेल 

कोथिंबीर

करायचे कसे?

एक मोठ्या बाऊलमध्ये एक कप गव्हाचे पीठ घ्या. त्यात पाव कप रवा, चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण चमच्याने मिक्स करा. आता त्यात थोडं - थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. बॅटर तयार करत असताना त्याच्या गाठी होणार नाही, याची काळजी घ्या. बॅटर अगदी पातळ किंवा जाडसर ठेवायचे नाही. आता त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.

एक कप साबुदाणा - एक किलो बटाट्याचे बनवा लच्छा पापड, क्रिस्पी पापड - टिकतील वर्षभर

एका कढईत एक टेबलस्पून तेल घालून गरम करा. त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कडीपत्ता, चिमुटभर हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेलात भाजून घ्या. याशिवाय आपण आपल्या आवडीच्या भाज्यांचा देखील वापर करू शकता. आता त्यात आलं - लसणाची पेस्ट घालून भाज्या परतून घ्या. भाज्या शिजवायचे नाही आहे, भाज्यांचा कच्चेपणा तसाच ठेवायचा आहे.

विकेंडला बनवा खमंग पारंपारिक पाटवडी, कमी साहित्यात - कमी वेळात डिश तयार

आता तयार भाज्यांचे मिश्रण व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बॅटरमध्ये मिक्स करा. दुसरीकडे नॉन स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ब्रशने तव्यावर तेल लावून ग्रीस करा. व डोश्याप्रमाणे मिश्रण तव्यावर पसरवा. थोड्या वेळेनंतर पलटी करून दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे गव्हाच्या पीठाचे जाळीदार धिरडे रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स