डोसा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो तव्यावर गरमागरम बनणारा डोसा. या डोशासोबत आंबटगोट सांबर आणि नारळाची चटणी खाण्याची मज्जा काही औरच असते. डोसा हा पदार्थ आता फक्त दाक्षिणात्य राज्यापुरता मर्यादित राहिला नसून तो देशभरात मोठ्या आवडीने खाल्ला जातो. यातही डोशाचे अनेक प्रकार असतात(Loni Sponge Dosa).
साधा डोसा, रवा डोसा, म्हैसूर डोसा असे अनेक प्रकार खवय्यांचे फेव्हरेट आहेत. त्यातही अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा डोशाचा एक प्रकार म्हणजे लोणी डोसा. हा स्पंजसारखा मऊ, जाळीदार डोसा (Soft Sponge Dosa Recipe) खायला जर तुम्हाला आवडत असेल तर, त्याची रेसिपी अगदी सोपी आहे. ही सोपी रेसिपी वापरुन तुम्ही मस्त मऊसूत, चवदार आणि खरपूस लोणी डोसा घरीही बनवू शकता(Loni Sponge Dosa).
साहित्य :-
१. तांदूळ - ३ कप
२. साबुदाणा - २ टेबलस्पून
३. पांढरी उडीद डाळ - १ कप
४. मेथी दाणे - १ टेबलस्पून
५. पोहे - १ कप
६. कुरमुरे - १ कप
७. खोबर - १/२ कप
८. मीठ - चवीनुसार
९. लोणी / बटर - २ ते ३ टेबलस्पून
दुधावर ठेवण्याची जाळी स्वच्छ - चकचकीत करण्याचा सोपा उपाय, काळी झालेली जाळी दिसेल नव्यासारखी...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये तांदूळ व साबुदाणा एकत्रित करून ते भिजत ठेवावे.
२. दुसरा एक बाऊल घेऊन त्यात पांढरी उडदाची डाळ व मेथी वेगळे भिजत घालावे.
३. एक मोठं भांड घेऊन त्यात पोहे व कुरमुरे हलकेच भिजवून घ्यावेत.
४. आता वरील सगळ्या मिश्रणातील पाणी काढून घेऊन एक एक करुन सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत.
फणस कापण्याचा व्याप मोठा, हात-सुरी चिकट होते? ३ सोप्या टिप्स- फणस खा- कापा-बरंका..
५. वाटून घेतलेले हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊन त्यावर झाकण ठेवावे.
६. पीठ फुलून येण्यासाठी हे मिश्रण ६ ते ७ तास तसेच झाकून ठेवावे.
७. त्यानंतर हे पीठ व्यवस्थित ढवळून घ्यावे आता यात चवीनुसार मीठ, किसलेलं खोबर घालावे.
८. आता गरम तव्यावर या पिठाचे डोसे घालून दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे. डोसे भाजून घेताना आपल्या आवडीनुसार त्याला लोणी किंवा बटर लावावे.
आता हे गरमागरम डोसे चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.