मॅगी म्हणजे अनेकांचा विकपॉईंट. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अगदी कधीही मॅगी खाऊ शकणारे अनेक मॅगी लव्हर्स आपल्या आजूबाजूला असतात. असाच बहुतांश लोकांना आवडणारा आणि अतिशय झटपट तयार होणारा सुपर यम्मी पदार्थ म्हणजे सॅण्डविच.. मॅगी आणि सॅण्डविच हे दाेन्ही पदार्थ जर तुम्हाला मनापासून आवडत असतील तर हा एक नवा आणि अतिशय चवदार पदार्थ करून बघाच..
या पदार्थाची खासियत म्हणजे लहान मुलांना मॅगी आणि ब्रेड हे दोन्ही पदार्थ आवडतात. त्यामुळे या दाेन्ही पदार्थांमध्ये दडवून अनेक भाज्या घाला आणि मुलांना भरपूर भाज्या टाकून मॅगी सॅण्डविच खायला द्या. भाज्यांचा भरपूर वापर असल्याने तुम्ही सकाळी नाश्ता किंवा दुपारच्या चहासोबत इव्हिनिंग स्नॅक्स म्हणूनही हा पदार्थ खाऊ शकता. कमीतकमी वेळेत अधिकाधिक चवदार मॅगी सॅण्डविच कसं करायचं याची रेसिपी इन्स्टाग्रामच्याgunjandelights या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे.
मॅगी सॅण्डविच तयार करण्यासाठी लागणारे साहित्यसॅण्डविच ब्रेड, मेयोनिज, कांदा- टोमॅटो- सिमला मिरची या भाज्या बारीक कापलेल्या, पिझ्झा सॉस, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, बटर, शिजवलेली मॅगी.कसं करायचं मॅगी सॅण्डविच?- यासाठी सगळ्यात आधी दोन ब्रेड घ्या. दोन्ही ब्रेडच्या एकेका बाजूने मेयोनिज लावा.- आता एका ब्रेडवर बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो टाका. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्या भाज्या टाकायच्या हे ठरवू शकता.- भाज्यांवर चिलिफ्लेक्स आणि ओरिगॅनो टाका. - आता मेयोनिज लावलेला दुसरा ब्रेड त्यावर ठेवा. मेयोनिज लावलेली बाजू भाज्यांवर असावी.- आता या ब्रेडच्या वरच्या बाजूला पिझ्झा सॉस लावा. त्यावर शिजवेली मॅगी घाला. त्यावर पुन्हा एक ब्रेड ठेवावा लागणार. या ब्रेडला पुन्हा मेयोनिज किंवा टोमॅटो सॉस असं काही लावा.
- आता हे तीन लेयर असणारं सॅण्डविच खालून- वरून बटर लावून ग्रील करून घ्या. किंवा मग सरळ तव्यावर बटर टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या..- गरमागरम सुपर यम्मी मॅगी सॅण्डविच झालं तयार.. - लहान मुलांसोबतच घरातल्या मोठ्या मंडळींनाही हे सॅण्डविच नक्की आवडेल.