Lokmat Sakhi >Food > इन्स्टंट नूडल्स करताना लक्षात ठेवा ३ खास गोष्टी, नेहमीच्याच नूडल्स होतील आणखी चवदार!

इन्स्टंट नूडल्स करताना लक्षात ठेवा ३ खास गोष्टी, नेहमीच्याच नूडल्स होतील आणखी चवदार!

Food And Recipe: रेडी टू कूक प्रकारातल्या नूडल्स करताना या काही सोप्या- सोप्या ट्रिक्स वापरा. नूडल्स नक्कीच आणखी चवदार लागतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 05:31 PM2022-10-31T17:31:08+5:302022-10-31T17:31:52+5:30

Food And Recipe: रेडी टू कूक प्रकारातल्या नूडल्स करताना या काही सोप्या- सोप्या ट्रिक्स वापरा. नूडल्स नक्कीच आणखी चवदार लागतील.

How to make maggie or any other instant noodles more tasty? Just 3 simple tips to make maggi or other instant noodles more delicious | इन्स्टंट नूडल्स करताना लक्षात ठेवा ३ खास गोष्टी, नेहमीच्याच नूडल्स होतील आणखी चवदार!

इन्स्टंट नूडल्स करताना लक्षात ठेवा ३ खास गोष्टी, नेहमीच्याच नूडल्स होतील आणखी चवदार!

Highlights नेहमीच्याच आपल्या नूडल्स आणखी चवदार लागाव्या, यासाठी या काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून बघा.

रेडी टू कूक प्रकारातल्या नूडल्स किंवा २ मिनिट्समध्ये (ready to cook, 2 minutes noodles) तयार होणाऱ्या इन्स्टंट नूडल्स हा सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार. अगदी लहान मुलांप्रमाणे वयस्कर व्यक्तीही या नूडल्स आवडीने खातात. बरं या नूडल्स खाण्यासाठी खास भूक असावीच लागते असं काही नाही. गप्पांचा अड्डा जमला की, घरात खायला दुसरं काहीच नसलं की, रात्री अभ्यास करताना भूक लागली तर, खूप पाऊस किंवा खूप थंडी असली तर,.. असा कोणताही बहाणा २ मिनिट्स नूडल्स खाण्यासाठी चालतो. पण कधी कधी करताना काहीतरी चुकतं आणि नूडल्सची (how to make noodles more tasty?) चव बिघडते. असं होऊ नये आणि नेहमीच्याच आपल्या नूडल्स आणखी चवदार लागाव्या, यासाठी या काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून बघा.

 

इन्स्टंट नूडल्स करताना लक्षात ठेवा..
१. पाण्याचं प्रमाण आणि मसाला टाकण्याची अचूक वेळ
कुणाकुणाला सूपी नूडल्स म्हणजेच पाणी भरपूर असणाऱ्या नूडल्स आवडतात. पण त्या सगळ्यांनाच आवडतील असं नाही. त्यामुळे नूडल्स जर चवदार करायच्या असतील तर पाणी अगदी बेताचंच टाका.

दिवाळीनंतर खूप दिवसांनी व्यायामाला सुरुवात करताय? ४ चुका करू नका, तज्ज्ञ सांगतात..

खूप पाणी झालं की नूडल्स पांचट लागतात. दुसरं म्हणजे पातेल्यात आधी पाणी टाका, त्यानंतर मसाला टाका. ते पाणी उकळायला सुरूवात झाली की मग त्यात नूडल्स टाका. नूडल्स, मसाला, पाणी असं सगळं एकदमच नको.

 

२. थोडंसं तेल आणि लसूण
मॅगी, यिप्पी किंवा कोणत्याही प्रकारच्या इन्स्टंट नूडल्स करताना त्यात अर्धा किंवा १ टीस्पून तेल जरूर टाका. तेलामुळे नूडल्सचं टेक्स्चरही बदलतं आणि चवही आणखी खास होते.

गरोदपणातली बेड रेस्ट म्हणजे अवघड काम.. बिपाशा बसू सांगते सक्तीच्या आरामात मजा नाही कारण.....

त्याशिवाय कच्च्या लसूणाच्या २- ३ पाकळ्या ठेचून नूडल्स शिजवताना टाकल्या तर त्याचा एकदमच छान फ्लेवर येतो.

 

३. भाज्या घालणार असाल तर
भाज्या घालून मॅगी करायची असल्यास कढईत आधी थोडं तेल टाकून भाज्या फ्राय करून घ्या. त्यात नूडल्सचा इन्स्टंट मसाला टाका. भाज्या परतून झाल्या की मग नंतर त्यात पाणी टाका. पाण्याला उकळी आल्यावर त्यात नूडल्स टाका.  


 

Web Title: How to make maggie or any other instant noodles more tasty? Just 3 simple tips to make maggi or other instant noodles more delicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.