महाराष्ट्रात भाकरी म्हटलं की त्याचा अस्सल जोडीदार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून गरमागरम पिठलंच आहे. मस्त गरमागरम वाफाळत पीठल त्यासोबत भाकरी, कांदा, लोणचं किंवा ठेचा असा फक्कड बेत आईनं पावसाळ्यात जमला तर अजून काय हवं...पिठलं हा प्रकार महाराष्ट्राच्या पारंपरिक पदार्थांपैकी एक आहे. महाराष्ट्रातल्या विविध राज्यांत वेगवेगळ्या चवीचं पिठलं तयार केल जात. घरात भाजी उपलब्ध नसेल तर, आपण पिठलं ही रेसिपी करू शकतो. ही रेसिपी कमी साहित्यात कमी वेळात तयार होते. व चवीलाही भन्नाट लागते.
पावसाळ्यात आपल्याला सतत गरमागरम काहीतरी ताटात असावं असं वाटतं. पावसाळ्याच्या काळात बाजारात भाजीपाला भरपूर प्रमाणात असतो. या काळात चांगली भूक तर लागतेच याचबरोबर खाल्लेले चांगले पचतेही. त्यामुळे या काळात शक्य तितके पौष्टीक खायला हवे. मेथीची भाजी म्हटली की आपण ती परतून करतो किंवा मेथीचे पराठे करतो. पण ग्रामीण भागात आवर्जून केले जाणारे मेथीचं पिठलं अतिशय चविष्ट लागतं. यावर लसणाची फोडणी दिल्याने त्याचा स्वाद आणखीनच वाढतो. तर यंदाच्या पावसाळ्यात हे अस्सल गावरान मेथीचं पिठलं कसं करायचं याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Maharashtrian Style Methi Pithla At Home In Just 10 Minutes).
साहित्य :-
१. तेल - २ ते ३ टेबलस्पून
२. मोहरी - १ टेबलस्पून
३. जिरे - १ टेबलस्पून
४. हिंग - १/२ टेबलस्पून
५. लसूण पाकळ्या - ५ ते ६ (बारीक चिरलेल्या)
६. कढीपत्ता - ६ ते ७ पाने
७. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरलेल्या)
८. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
९. हळद - १ टेबलस्पून
१०. मेथी - १ ते १,१/२ कप (बारीक चिरलेली मेथी)
११. मीठ - चवीनुसार
१२. पाणी - गरजेनुसार
१३. बेसन पीठ - २ कप
१४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून ते भिजवून घ्यावे. ते चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे, त्यात पिठाची एकही गुठळी ठेवू नका.
२. आता एका कढईमध्ये थोडेसे तेल, जिरे, मोहरी, हिंग, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा, हळद, मीठ घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी.
३. त्यानंतर या फोडणीत बारीक चिरलेली मेथी घालून घ्यावी. मेथी घातल्यानंतर या मिश्रणात थोडेसे पाणी ओतून घ्यावे.
अस्सल सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करा १० मिनिटांत, सोलापुरी चटणीची पारंपरिक रेसिपी...
घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...
४. आता या तयार खमंग फोडणीमध्ये भिजवून घेतलेले बेसन पीठ घालावे. त्यानंतर चमच्याने ढवळून फोडणी व बेसन पीठ एकत्रित करून घ्यावे.
५. त्यानंतर हे पीठल थोडेसे घट्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत राहावे. तसेच हलकेच एक उकळी काढून घ्यावी.
६. आता आपल्या आवडीनुसार एका छोट्या भांड्यात तेल, लाल तिखट मसाला, लसूण पाकळ्या घेऊन फोडणी तयार करावीव ही फोडणी तयार पिठल्यावर घालावी.
महागडे टोमॅटो विकत आणलेत ? लवकर खराब होऊ नयेत म्हणून १ खास टिप...
आपले गरमागरम खमंग मेथी पिठलं भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.