'तोंडली' ही एक अतिशय पौष्टिक फळभाजी आहे. आपल्याकडे बरेचदा तोंडलीची भाजी केली जाते. मसालेभातापासून विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये तोंडलीचा वापर केला जातो. या इवल्याशा तोंडलीच्या भाजीमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्व असतात. तोंडलीच्या भाजीमधून शरीराला पुरेसे व्हिटॅमिन्स, लोह, फायबर्स, कॅल्शिअम आणि इतर पोषक घटक मिळतात. शिवाय तोंडली पचायला हलकी असल्यामुळे तोंडलीची भाजी खाण्यामुळे पचनशक्ती सुधारते. रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी तोंडलीची भाजी खाणं फायदेशीर ठरू शकतं. तोंडली थोडी चवीला तुरट असल्यामुळे ती खाण्याचा कंटाळा येतो. मात्र जर तोंडलीची भाजी किंवा तोंडलीचे इतर निरनिराळे पदार्थ बनवले तर ते घरच्यांना नक्कीच आवडू शकतात (Tondli bhat - pulao recipe).
पूर्वीच्या काळी कुठला सण, समारंभ म्हटलं की जेवणाच्या पंगतीत वेगवेगळ्या प्रकारचा पुलाव भात (Maharashtrian Tendli Bhaat) हा नेहमी असायचा. कुठल्याही सण, समारंभाचा मेन मेन्यू म्हटलं की, मसाले भात, (Tondli Bhat, Rice with Ivy Gourd) जिलेबी, मठ्ठा असे पदार्थ हमखास असायचेच. या पदार्थांमध्ये, पुलाव भाताचे वेगवेगळे प्रकार बनवले जायचे, तोंडली भात हा त्यापैकीच एक पदार्थ आहे. आपण देखील या सणावाराच्या खास पंगतीत झटपट तयार होणारा तोंडली भात (Maharashtrian Style – Tendli Rice, Tondli Cha Bhaat) बनवू शकता. तोंडली भात बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Maharashtrian Tendali bhat recipe).
साहित्य :-
१. तोंडली - अर्धा किलो तोंडली (उभी लांब कापून घ्यावी)२. आलं - लसूण - मिरचीची पेस्ट - १ ते २ टेबलस्पून २. तूप - १ ते २ टेबलस्पून ३. हिंग - चिमूटभर ४. हळद पावडर - १/२ टेबलस्पून ५. आंबेमोहोर तांदूळ - २ ते ३ कप ( ३ ते ४ तास आधी पाण्यांत भिजवून घेतलेला)६. गोडा मसाला - १ ते २ टेबलस्पून ७. मीठ - स्वादानुसार ८. काजू - ७ ते ८ (पाण्यांत भिजवलेले)९. हिरव्या मिरच्या - ७ ते ८ हिरव्या मिरच्या१०. गूळ - ३ ते ४ टेबलस्पून ११. किसलेलं खोबर - ३ ते ४ टेबलस्पून १२. लिंबाचा रस - १ ते २ टेबलस्पून १३. पाणी - गरजेनुसार १४. बारीक चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून
भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात तांदूळ घेऊन ते पाण्यांत ३ ते ४ तास भिजत घालावेत. २. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेऊन त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. ३. आता एक मोठे भांडे घेऊन सर्वप्रथम त्यात साजूक तूप घालून घ्यावे. ४. त्यानंतर त्यात हिंग, हळद व ३ ते ४ तास पाण्यांत भिजवून घेतलेला तांदूळ घालावा. त्यानंतर या मिश्रणात आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर यांची पेस्ट घालावी.
फक्त २० मिनिटांत करा १ कप रव्याचे मोदक, फ्रिजमध्ये १० दिवसही टिकणाऱ्या मोदकांची सोपी रेसिपी...
सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...
५. आता या सगळ्या मिश्रणात गोडा मसाला, चिरुन घेतलेली तोंडली, भिजवून घेतलेले काजू, चवीनुसार मीठ, पाणी घालून घ्यावे. ६. त्यानंतर या सगळ्या मिश्रणात किसलेला गूळ घालून घ्यावा मग सगळे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावे. ७. आता या भांड्यावर झाकण ठेवून ४ ते ५ मिनिटे एक वाफ येऊ द्यावी. या वाफेवर भात शिजवून घ्यावा. ८. भात शिजवूंन घेतल्यावर झाकण उघडल्यानंतर या भातावर तूप घालून घ्यावे, थोडेसे पाणी, लिंबाचा रस, किसलेलं खोबर, बारीक चिरुन घेतलेली कोथिंबीर घालावी.
प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा करायचा ? शिरा भगराळा होऊ नये, गाठी राहू नये म्हणून सोप्या टिप्स...
अशाप्रकारे आपला तोंडली भात खाण्यासाठी तयार आहे.