Lokmat Sakhi >Food > टोमॅटोचे पारंपरिक सार करा, आंबट गोड चव जेवणात हवीच - उन्हाळा होईल सुसह्य...

टोमॅटोचे पारंपरिक सार करा, आंबट गोड चव जेवणात हवीच - उन्हाळा होईल सुसह्य...

How To Make Maharashtrian Tomato Saar : Tomato Saar Recipe : चमचमीत, आंबट - गोड टोमॅटोचे सार.. सोपी रेसिपी, साध्या भाताचीही वाढेल लज्जत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 02:15 PM2023-03-10T14:15:25+5:302023-03-10T17:27:50+5:30

How To Make Maharashtrian Tomato Saar : Tomato Saar Recipe : चमचमीत, आंबट - गोड टोमॅटोचे सार.. सोपी रेसिपी, साध्या भाताचीही वाढेल लज्जत...

How To Make Maharashtrian Tomato Saar : Tomato Saar Recipe | टोमॅटोचे पारंपरिक सार करा, आंबट गोड चव जेवणात हवीच - उन्हाळा होईल सुसह्य...

टोमॅटोचे पारंपरिक सार करा, आंबट गोड चव जेवणात हवीच - उन्हाळा होईल सुसह्य...

टोमॅटो हा आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणारा महत्वाचा घटक आहे. डाळ, भाजी, आमटी, पुलाव कोणताही पदार्थ बनवायचा झाला तर त्यात टोमॅटो हा लागतोच. टोमॅटोचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने जेवणांत वापर करतो. टोमॅटो कधी बारीक चिरुन, त्याची प्युरी बनवून, मध्यम आकाराचे तुकडे कापून अशा अनेक पद्धतीने टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणाची लज्जत वाढवतो.

काहीवेळा आपल्याला रोजच्या त्याच त्याच जेवणाचा कंटाळा येतो. जेवताना आपण भातासोबत डाळ, ताकाची कढी, आमटी, उसळ, वरण असे अनेक पदार्थ खातो. परंतु कित्येकवेळा आपल्याला  या डाळी, आमट्या खाऊन कंटाळा येतो. त्याचबरोबर भातासोबत काहीतरी तिखट, आंबट - गोड, झणझणीत खाण्याची इच्छा होतेच. भातासोबत नवीन काहीतरी चटपटीत, चमचमीत खावेसे वाटते. अशावेळी आपण झटपट बनणारे टोमॅटोचे सार तयार करुन गरमागरम भातासोबत खाऊ शकता. रोजची डाळ, आमटी, वरण खाऊन बोर झाला असाल तर झटपट बनणारे टोमॅटोचे सार नक्की ट्राय करुन पाहा(How To Make Maharashtrian Tomato Saar : Tomato Saar Recipe).        

साहित्य :- 

१. बेडगी मिरची - ६ ते ७ 
२. धणे - २ टेबलस्पून 
३. त्रिफळा - ३ 
४. लसूण - ८ ते १० पाकळ्या 
५. कांदा - १ (उभा चिरुन घेतलेला)
६. टोमॅटो - ३ 
७. कोथिंबीर - १ टेबलस्पून 
८. तेल - २ टेबलस्पून 
९. मिठ - चवीनुसार 
१०. ओलं खोबर - १ कप (किसून घेतलेलं)
११. कढीपत्ता - ५ ते ६ पानं 
१२. पाणी - ३ ते ४ कप 


कृती :- 

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात धणे, त्रिफळा व बेडगी मिरची मोडून १५ ते ३० मिनिटे भिजत घालावे.   
२. टोमॅटोचे लहान तुकडे करुन ते मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची प्युरी बनवून घ्यावी. 
३. त्यानंतर मिक्सरमध्ये भिजत घातलेले धणे, त्रिफळा व बेडगी मिरची त्याचबरोबर उभा चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, किसून घेतलेलं ओलं खोबर असे घालून त्याचे घट्टसर वाटप तयार करुन घ्यावे. 
४. आता एका भांड्यात तेल घेऊन त्यात कढीपत्ता, ३ ते ४ लसूण पाकळ्या व टोमॅटोचे वाटप घालून ते व्यवस्थित गरम तेलावर परतवून घ्यावे.


५. टोमॅटोच्या वाटपाला ४ ते ५ मिनिटानंतर तेल सुटल्यावर त्यात टोमॅटोची प्युरी घालावी. 
६. हे सगळे जिन्नस व्यवस्थित शिजवून घ्यावेत. 
७. १० ते १५ मिनिटे शिजल्यानंतर त्यात आपल्या आवडत्या कंन्सिस्टंसीनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालावे.   
८. आता या भांड्यावर झाकण ठेवून हलकेच एक उकळी काढून घ्यावी. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. 

टोमॅटोचे सार खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भात किंवा पोळीसोबत आपण हे टोमॅटोचे सार खाऊ शकता.

Web Title: How To Make Maharashtrian Tomato Saar : Tomato Saar Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.