भेळ म्हणताच आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटते. शेव, कुरमुरे, फरसाण, कांदा, टोमॅटो, गोड - तिखट चटण्या यांच्यापासून तयार झालेली चटपटीत भेळ खायला सगळ्यांनाच आवडते. आपण किमान आठवड्यातून एकदा तरी संध्याकाळच्या नाश्त्याला अशी झटपट होणारी चटपटीत भेळ खाणे पसंत करतो. परंतु आजकाल काहीजण आपल्या डाएट आणि हेल्थच्या बाबतीत खूपच काळजी घेताना दिसून येतात. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी अरबट - चरबट खाण्यापेक्षा हेल्दी खाण्याचा पर्याय निवडतात.
संध्याकाळच्या ४ वाजताच्या छोट्या भुकेसाठी आपण काहीतरी हेल्दी खाण्यावर जास्त भर देतो. अशावेळी भूक लागली असता आपण झटपट तयार होणारी मखाणा भेळ घरच्या घरी करू शकतो. रोजच्या भेळीपेक्षा मखाणा भेळ खाणे हा हेल्थ आणि डाएटच्या बाबतीत एक उत्तम पर्याय असू शकतो. आपल्या रोजच्याच भेळेला मखाण्याची जोड देऊन प्रोटीन रिच मखाणा भेळ घरच्या घरी बनवू शकतो. यामुळे आपले हेल्दी डाएट देखील पाळले जाईल आणि काहीतरी चटपटीत, मसालेदार खाण्याचा आनंद देखील मिळेल(How To Make Makhana Bhel At Home : Homemade Recipe).
साहित्य :-
१. भाजलेले मखाणे - १ कप
२. भाजलेले शेंगदाणे - १ कप
३. भाजलेले चणे - १ कप
४. कांदा - १/३ कप
५. टोमॅटो - १/३ कप
६. काकडी - १/३ कप
७. मीठ - चवीनुसार
८. चाट मसाला - चवीनुसार
९. लाल तिखट मिरची पावडर - १/२ टेबलस्पून
१०. हिरवी चटणी - १ टेबलस्पून
११. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
१२. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
वडापाव सँडविच - चहासोबत खाऊन तर पाहा! करायला सोपे आणि चविष्ट, घरात सर्वांना आवडेल...
सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये, भाजून घेतलेले मखाणे घ्यावेत.
२. त्यानंतर त्यात भाजून घेतलेले चणे, शेंगदाणे घालावेत.
३. आता यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी घालावी.
४. त्यानंतर या मखाण्यांमध्ये, चवीनुसार मीठ, चाट मसाला, लाल तिखट मिरची पावडर भुरभुरवून घालावी.
५. सगळ्यांत शेवटी यात हिरवी चटणी, लिंबाचा रस, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
६. आता ही मखाण्यांची भेळ चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्यावी.
उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...
झटपट होणारी चविष्ट, मसालेदार, चटपटीत मखाणा भेळ खाण्यासाठी सर्व्ह करावी.