Lokmat Sakhi >Food > भाजणीचे थालीपीठ तर आपण खातोच पण मंचूरियन थालीपीठ? हे थालीपीठ नक्की भारतीय म्हणायचे की चिनी..

भाजणीचे थालीपीठ तर आपण खातोच पण मंचूरियन थालीपीठ? हे थालीपीठ नक्की भारतीय म्हणायचे की चिनी..

How To Make Manchurian Thalipeeth At Home : नेहमीचे मंचूरियन आपल्या ओळ‌खीचे त्याच चवीचे खमंग थालीपीठ मिळाले तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 07:59 AM2023-04-12T07:59:50+5:302023-04-12T08:05:58+5:30

How To Make Manchurian Thalipeeth At Home : नेहमीचे मंचूरियन आपल्या ओळ‌खीचे त्याच चवीचे खमंग थालीपीठ मिळाले तर..

How To Make Manchurian Thalipeeth At Home | भाजणीचे थालीपीठ तर आपण खातोच पण मंचूरियन थालीपीठ? हे थालीपीठ नक्की भारतीय म्हणायचे की चिनी..

भाजणीचे थालीपीठ तर आपण खातोच पण मंचूरियन थालीपीठ? हे थालीपीठ नक्की भारतीय म्हणायचे की चिनी..

व्हेज मंचुरियन ही एक चटपटीत, झणझणीत स्वादिष्ट डिश आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस, मिक्स भाज्या बारीक चिरुन हे सगळे जिन्नस एकजीव करुन चटपटीत मंचुरियन बनवले जातात. व्हेज मंचुरियन हे भारतातील सर्वत्र लोकप्रिय असलेल्या इंडो - चायनीज पदार्थांपैकी एक आहे. मंचुरियनचे ग्रेव्ही मंचुरियन व ड्राय मंचुरियन असे दोन प्रमुख प्रकार असतात. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे गाजर, कोबी, कांद्याची पात, कांदा, फरसबी, शिमला मिरची यांचा वापर करून व्हेज मंचुरियन बनवले जाते. सध्या स्ट्रीट फूड म्हणून रस्तोरस्ती ही डिश अतिशय फेमस आहे. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ फार आवडतो. 

थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरी सकाळचा नाश्ता म्हणून भाजणीचे थालीपीठ आवडीने खाल्ले जाते. थालीपीठ नुसतं चवीनं श्रीमंत नाही, तर ते पौष्टिकही आहे. भाजणीचं पीठ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे, तीळ, वाटलेलं आलं-लसूण चांगलं मिसळायचं, थोडं थोडं पाणी मिसळत घट्ट मळायचं. त्याचे छोटे गोळे करायचे. तव्यावर तेल टाकून तो गोळा थापायचा. मध्ये छिद्र पाडलं की ते छान भाजलं जातं. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचं. लोणचं, चटणी, सॉस, दही असं काहीही सोबत असलं की फक्कड बेत जमतोच. भारतीय पदार्थांमध्ये नाविन्यता असते असं म्हटलं जात. आपण भारतीय आपल्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये नवीन प्रयोग करुन पाहण्यात माहीर असतो. त्याचेच एक खास उदाहरण म्हणजे मंचुरियन थालीपीठ. आता मंचुरियन मध्ये असणाऱ्या भाज्यांच्या वापर करून आपण झटपट होणारे मंचुरियन थालीपीठ देखील बनवू शकतो. bhaiyajiletscook या इंस्टाग्राम पेजवरुन मंचुरियन थालीपीठ कसे बनवायचे याची झटपट कृती शेअर करण्यात आली आहे(How To Make Manchurian Thalipeeth At Home). 


साहित्य :- 

१. कोबी - १/४ कप (बारीक चिरुन घेतलेला)
२. गाजर -  १/४ कप (बारीक चिरुन घेतलेले)
३. फरसबी - १/४ कप (बारीक चिरुन घेतलेली)
४. कांदा - १/४ कप (बारीक चिरुन घेतलेला)
५. कांद्याची पात - १/४ कप (बारीक चिरुन घेतलेली)
६. मैदा - २ टेबलस्पून 
७. तांदळाचे पीठ - ३ टेबलस्पून 
८. सोया सॉस - १ टेबलस्पून 
९. चिली सॉस - १ टेबलस्पून 
१०. मीठ - चवीनुसार 
११. तेल - ४ ते ५ टेबलस्पून 
१२. शेजवान सॉस - १ टेबलस्पून
१३. व्हिनेगर - १ टेबलस्पून  

जाळीदार डोसे, लुसलुशीत इडली हवी? पाहा डाळ तांदूळ प्रमाण गणित, करा परफेक्ट साऊथ इंडियन पदार्थ...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरुन घेतलेला कोबी,गाजर, कांदा, फरसबी, कांद्याची पात घ्यावी. 
२. आता हे सर्व जिन्नस बाऊलमध्ये एकत्रित करुन त्यात चवीनुसार मीठ घालावे. 
३. या बारीक चिरुन घेतलेल्या भाज्यांमध्ये सोया सॉस व व्हिनेगर घालावे. 
४. या सगळ्या मिश्रणात मैदा व तांदळाचे पीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करुन घट्टसर पीठ मळून घ्यावे. 

५. आता या मिश्रणाचे छोटे - छोटे गोळे करुन घ्यावेत. 
६. त्यानंतर थोडेसे तेल ओतून त्यावर हे थालीपीठाचे गोळे ठेवून गोलाकार थालीपीठ थापून घ्यावे. 
७. आता पॅनला थोडेसे तेल लावून घ्यावे त्यावर हे थापून घेतलेले थालीपीठ भाजण्यासाठी ठेवावे. 
८. हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे. 

रोज नारळ खवण्यासाठी वेळ जातोय, १ सोपी ट्रिक...नारळाचा किस स्टोअर करुन ठेवा दीर्घकाळ...

मंचुरियन थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. हे गरमागरम मंचुरियन थालीपीठ शेजवान सॉस किंवा चटणी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.

Web Title: How To Make Manchurian Thalipeeth At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.