Join us  

आंबा आणि साखर, दोनच गोष्टी वापरून करा परफेक्ट आंब्याचा जॅम, वर्षभर टिकेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2023 4:53 PM

How To Make Mango Jam At Home : Homemade Mango Jam Recipe : उन्हाळ्यात प्रत्येक घरोघरी आंबा व कैरीचे वेगवेगळे पदार्थ तयार करुन ते वर्षभर खाण्यासाठी साठवले जातात, आंब्याचा जॅम तयार केला तर तो ब्रेडला लावून खाऊ शकतो.

सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना ब्रेड बटर, किंवा ब्रेड जॅम खायला आवडते. मस्त गोड गोड घट्ट जॅम ब्रेडला लावून मग तो खाणे यासारखे स्वर्गसुख नाही. काहीवेळा घरातील लहान मुलं फळं व भाज्या असे पौष्टिक अन्न खाण्यास नकार देतात. त्याचबरोबर ही लहान मुलं कधी काय खाण्याचा हट्ट करतील किंवा कधी काय खायला नकार देतील हे सांगता येणे कठीण असते. परंतु असे असले तरीही आपल्या मुलांनी काहीतरी हेल्दी खाव अशी प्रत्येक आईची इच्छाच असते. पण मुलं असे नेमके पौष्टिक व हेल्दी पदार्थ खाण्यालाच नकार देतात. अशा परिस्थितीत हे पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटात कसे जातील यासाठी आई अनेक मार्गांनी प्रयत्न करत असते. 

मुलांना पौष्टिक खाऊ घालण्यासाठी त्यांच्या मागे लागण्यापेक्षा, या पौष्टिक पदार्थांना थोडेसे नवीन व आकर्षक रुप दिले तर ही मुलं हे पदार्थ आवडीने खातात. मुलं जर फळ खात नसतील तर त्याच फळांचे पौष्टिक जॅम बनवून आपण मुलांना देऊ शकतो. काहीवेळा आपल्या आवडीची भाजी नसली किंवा काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर आपण पोळी किंवा ब्रेडला जॅम लावून खाऊ शकतो. उन्हाळ्यात प्रत्येक घरोघरी आंबा व कैरीचे वेगवेगळे पदार्थ तयार करुन ते वर्षभर खाण्यासाठी साठवले जातात. उन्हाळ्यात बाजारात विकत मिळणारा फळांचा राजा आंबा खायला तसा सगळ्यांनाच आवडतो. या आंब्याचा जॅम तयार केला तर तो ब्रेडला लावून खाऊ शकतो. तसेच जे लोक आंबा खात नाहीत, तर जॅमच्या स्वरुपात आंब्यातील पौष्टिक गुणधर्म त्यांना मिळू शकतात(How To Make Mango Jam At Home : Homemade Mango Jam Recipe).

साहित्य :- 

१. पिकलेले आंबे - ४२. साखर - ३/४ कप 

प्या गारेगार कोकोनट मँगो मिल्कशेक, उन्हाळा सुसह्य करणारी रेसिपी - हॉटेलपेक्षा भारी चव...

कृती :- 

१. सर्वप्रथम आंबा कापून त्याच्या लहान लहान फोडी करुन घ्याव्यात. २. आपण या फोडी थोड्या मिक्सरला वाटून घेऊ शकता. (आंब्याचा संपूर्ण रस न करता त्यातील काही फोडी तशाच ठेवाव्यात.)३. आता एक पॅन घेऊन तो मंद आचेवर गरम करत ठेवावा. ४. पॅन गरम झाल्यावर त्यात या आंब्याचे थोडे जाडसर असलेले मिश्रण ओतून घ्यावे. 

आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्याच्या ३ ट्रिक्स, आंबा रस टिकेल उत्तम आणि हवा तेव्हा खाता येईल...

सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...

५. त्यानंतर यात साखर घालावी. ६. आता साखर आंब्याच्या दाटसर मिश्रणात संपूर्णपणे वितळेपर्यंत हे मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावे.७. साखर संपूर्णपणे विरघळून एकजीव झाल्यानंतर आपला आंब्याचा जॅम खाण्यासाठी तयार आहे. ८. हा जॅम थोडा गार झाल्यावर एका हवाबंद बरणीत भरुन ठेवावा. 

आंब्याच्या मौसमात आमरस खाण्याची चंगळ, पण घाईच्यावेळी कसा कराल झटपट आमरस?

आंब्याचा गोड जॅम खाण्यासाठी तयार आहे. हा जॅम एका हवाबंद बरणीत भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवल्यास किमान ५ ते ६ महिन्यांसाठी तो चांगला टिकून राहतो. व आपल्याला हवा तेव्हा खाता येतो.

टॅग्स :अन्नपाककृती