Lokmat Sakhi >Food > वर्षभर टिकेल असा आंब्याचा जाम,चपाती- ब्रेडसोबत मुले आवडीने खातील, करायला अगदी सोपा

वर्षभर टिकेल असा आंब्याचा जाम,चपाती- ब्रेडसोबत मुले आवडीने खातील, करायला अगदी सोपा

Mango jam recipe: Homemade mango jam: How to make mango jam at home without preservatives: Mango jam recipe for bread and chapati: कमीत कमी पदार्थांमध्ये होणारा चविष्ट जाम कसा तयार करायचा पाहूया सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2025 15:56 IST2025-04-13T15:54:55+5:302025-04-13T15:56:16+5:30

Mango jam recipe: Homemade mango jam: How to make mango jam at home without preservatives: Mango jam recipe for bread and chapati: कमीत कमी पदार्थांमध्ये होणारा चविष्ट जाम कसा तयार करायचा पाहूया सोपी पद्धत

how to make mango jam recipe eat bread or chapati kids favorite food | वर्षभर टिकेल असा आंब्याचा जाम,चपाती- ब्रेडसोबत मुले आवडीने खातील, करायला अगदी सोपा

वर्षभर टिकेल असा आंब्याचा जाम,चपाती- ब्रेडसोबत मुले आवडीने खातील, करायला अगदी सोपा

ताजा रसिले आम का स्वाद... उन्हाळ्यात आपल्याला आंब्याची चव चाखायला मिळते.(Mango jam recipe) आंबा म्हटलं की, अनेकांचा जीव की प्राणच. ऋतूमानानुसार येणारं हे फळ किती खाऊ आणि किती नको असे आपल्याला होते. त्यामुळे आपण हवे तेवढे आंबे खातो.(Homemade mango jam) इतकेच नाही तर आमरस, आंबापोळी, मँगो शेक, आंब्याचा शिरा, आइस्क्रिम अशा किती तरी पदार्थांची चव आपण चाखतो. ( How to make mango jam at home without preservatives)
आंब्याची चव साठवण्यासाठी आपण घरामध्ये अनेक नवनवीन प्रकारच्या रेसिपी ट्राय करतो. (Mango jam recipe for bread and chapati) आंबा हे फळ अगदी लहान मुलांपासून मोठ्यांना जास्त प्रमाणात आवडते. या फळाची चव चाखण्यासाठी आपण त्याची साठवण कशी करता येईल यावर भर देतो.(Homemade mango jam without pectin) पण आंब्याचा जाम आपण फारसा करत नाही. बाजारात मिळणारा विकतचा जाम आपण आणून खातो. तो जास्त दिवस टिकावा यासाठी अनेक प्रिझर्वेटिव्ह पदार्थ वापरले जातात.(Natural mango jam recipe for kids) पण हाच जाम घरात तयार केला तर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. तसेच मुलांच्या आवडीचा पदार्थ असल्यामुळे ते चार घास जास्तीचे खातील. कमीत कमी पदार्थांमध्ये होणारा चविष्ट जाम कसा तयार करायचा पाहूया सोपी पद्धत 

घावन करताना जाळी पडत नाही,जाड होतात? १० मिनिटांत करा तांदळाच्या पिठाचे मऊ-लुसलुशीत घावने

साहित्य 

आंबे - ४ (१ बदामी, २ केसरी, १ लंगडा) 
साखर - १/४ कप 
लिंबू- १/२ कप 

">

कृती 

1. आंब्याचा जाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बारीक फोडी करुन मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. 

2. आता मंद आचेवर पॅन गरम करा. त्यात आंब्याची पेस्ट तयार करुन ढवळत राहा. पॅन जाड असायला हवा. मिश्रण तळाला चिकटून जळणार नाही, याची काळजी घ्यावी. 

3. ही पेस्ट शिजवल्यानंतर २ ते ३ मिनिटे शिजवल्यानंतर त्यात साखर घालून चांगले ढवळून घ्या. हळूहळू मिश्रणाचा रंग बदलेल. 

4. मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात लिंबाचा रस घाला. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जाड नसावे याची काळजी घ्याल. मिश्रण व्यवस्थित झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी प्लेटवर ओतल्यावर पसरत नसेल तर ते तयार आहे समजावे. 

5. थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीत साठवून ठेवू शकता. 


 

Web Title: how to make mango jam recipe eat bread or chapati kids favorite food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.