Join us  

Fresh Mango Salsa Recipe : आंब्याचा सिझन संपण्यापूर्वी करा मँगो साल्सा, आंब्याची मस्त रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2022 7:53 PM

आंब्याचे विविध प्रदार्थ केले जातात. पण चटपटीत स्वरुपात आंब्याची चव चाखण्यासाठी करा मॅंगो साल्सा.

ठळक मुद्देमॅंगो साल्सा करताना सर्व जिन्नस एकत्र करण्यासाठी लांब चमच्याचा वापर करावा. 

आंबा हा चिरुन , चोखून किंवा त्याचा रस करुन खाल्ला जातो. आंब्याचे विविध गोड पदार्थही केले जातात. पण मस्त पिकलेल्या गोड आंब्याचा चटपटीत पदार्थ खाल्ला आहे का? चटपटीत स्वरुपात आंब्याची  चव चाखण्यासाठी मॅंगो साल्सा करावा. साल्सा म्हणजे मेक्सिकन फूडचा अविभाज्य भाग आहे. मेक्सिकन फूडमध्ये साल्सा हा साॅसचा प्रकार आहे.  साल्सा म्हणजे टमाट्याचा तिखट साॅस. यात लाल ओली मिरची, कांदा, लसूण घातला जातो. तसेच  यात जिरे आणि कोथिंबीरही घातली जाते. मेक्सिकन फूडमध्ये डिपचा एक प्रकार म्हणून साल्सा वापरला जातो. साॅस स्वरुपातला साल्सा सॅलेड स्वरुपातही करता येतो. सॅलेड स्वरुपातला साल्साचा चविष्ट प्रकार म्हणजे मॅंगो साल्सा. घरच्याघरी अगदी सहज हा मॅंगो साल्सा तयार करता येतो. 

Image: Google

कसा करायचा मॅंगो साल्सा?

मॅंगो साल्सा तयार करण्यासाठी 3 पिकलेले आंबे, बारीक चिरलेली 1 मध्यम आकाराची लाल सिमला मिरची, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 भोंगी मिरची बारीक चिरलेली, एका लिंबाचा रस आणि पाव चमचा मीठ एवढं साहित्य लागतं.

Image: Google

मॅंगो साल्सा करताना एका मोठ्या भांड्यात आंब्याच्या फोडी,  सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर आणि भोंगी मिरची हे सर्व  बारीक चिरुन एकत्र करुन घ्यावं. हे नीट मिसळून घेतलं की त्यावर लिंबाचा रस घालावा. सर्व साहित्य पुन्हा एकत्र मिसळून घेतल्यानंतर यात मीठ घालावं. मीठ घातल्यानंतर सर्व जिन्नस पुन्हा मिसळून  घ्यावं.

Image: Google 

साहित्य मिसळताना लांब चमच्याचा वापर करावा. साल्साला उत्तम चव येण्यासाठी सर्व साहित्य मिसळल्यानंतर ते दहा ते पंधरा मिनिटं तसंचं ठेवावं. साल्सा उरला तर फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात साठवून येतो. सॅलेड म्हणून हा मॅंगो साल्सा खाता येतो. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा उत्तम प्रकार आहे. 

टॅग्स :अन्नआंबापाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.