Lokmat Sakhi >Food > दुधाला विरजण म्हणून लावा ‘हे’ ३ पदार्थ, कुणाकडे विरजण मागायची गरज नाही! परफेक्ट दह्यासाठी उपयुक्त...

दुधाला विरजण म्हणून लावा ‘हे’ ३ पदार्थ, कुणाकडे विरजण मागायची गरज नाही! परफेक्ट दह्यासाठी उपयुक्त...

How to make Thick Curd At Home : Tips & Tricks To Make Curd At Home : How to set Curd at home Perfectly : The Secrets to Making the Perfect Homemade Dahi : how to make market style thick curd at home : दही लावायला काहीवेळा पुरेसे विरजण नसते अशावेळी, काय करावे यासाठी ३ खास टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2025 15:19 IST2025-04-12T15:07:05+5:302025-04-12T15:19:55+5:30

How to make Thick Curd At Home : Tips & Tricks To Make Curd At Home : How to set Curd at home Perfectly : The Secrets to Making the Perfect Homemade Dahi : how to make market style thick curd at home : दही लावायला काहीवेळा पुरेसे विरजण नसते अशावेळी, काय करावे यासाठी ३ खास टिप्स..

how to make market style thick curd at home The Secrets to Making the Perfect Homemade Dahi | दुधाला विरजण म्हणून लावा ‘हे’ ३ पदार्थ, कुणाकडे विरजण मागायची गरज नाही! परफेक्ट दह्यासाठी उपयुक्त...

दुधाला विरजण म्हणून लावा ‘हे’ ३ पदार्थ, कुणाकडे विरजण मागायची गरज नाही! परफेक्ट दह्यासाठी उपयुक्त...

सध्या उन्हाळा ऋतू असल्याने दही, ताक यांसारखे पदार्थ अगदी दररोज खाल्ले जातात. आपल्यापैकी काहीजण रोजच्या जेवणात दही, ताक या दोघांपैकी एक पदार्थ तर नक्की आवर्जून खाल्ला ( how to make market style thick curd at home) जातो. उन्हळ्यात रोजच्या आहारात दही, ताकाचा समावेश करणे (How to make Thick Curd At Home) आवश्यक असते. उन्हाळ्यात रोजच्या रोज दही - ताक खायचे म्हटल्यावर ते विकत आणण्यापेक्षा घरच्याघरीच तयार केले तर पुढचे काही दिवस पुरवठ्याला येते. विकतचे दही (Tips & Tricks To Make Curd At Home) आणण्यापेक्षा घरीच रोजच्या रोज ताजे दही खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने केव्हाव्ही उत्तम. परंतु या उन्हाळ्याच्या दिवसांत घरीच दही लावायचे म्हटले की ते काहीवेळा उष्णतेमुळे व्यवस्थित तयार होत नाही (The Secrets to Making the Perfect Homemade Dahi).

काहीवेळा हे दही पातळ पाण्यासारखे आणि चवीला आंबट होते. घरीच तयार केलेलं दही हे विकतच्या दह्यासारखे घट्ट, दाटसर होत नाही. अनेकदा आतापण विकत सारखेच दही घरी तयार करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो, परंतु तरीही काही केल्या ते घट्ट, दाटसर होत नाही. याचबरोबर, आपल्याकडे दही लावण्यासाठी पुरेसे विरजण देखील काहीवेळा नसते. अशा परिस्थितीत, विरजण न वापरता देखील विकतसारखे घट्ट, दाटसर परफेक्ट चवीचं दही घरीच तयार करण्यासाठी आपण किचनमधील ३ सिक्रेट पदार्थांचा वापर करु शकतो. हे ३ सिक्रेट पदार्थ कोणते ते पाहूयात. 

विकतसारखे घट्ट, दाटसर परफेक्ट चवीचं दही करण्यासाठी टिप्स... 

१. चांदीचं नाणं किंवा अंगठी :- विकतसारखे घट्ट, दाटसर आणि परफेक्ट चवीचं दही घरीच करण्यासाठी आपण चांदीचं नाणं किंवा अंगठी वापरु शकता. यासाठी सर्वात आधी दूध व्यवस्थित गरम करून घ्यावे. दूध गरम करून झाल्यावर ते हलके कोमट करून घ्यावे. या कोमट दुधात एक चांदीचं नाणं किंवा अंगठी घालावी. त्यानंतर हे गरम दूध झाकून उबदार अशा जागी ठेवून द्यावे. त्यानंतर ५ ते ६ तासांनी आपण पाहू शकता की भांड्यात विकतसारखे घट्ट, दाटसर दही तयार झालेले असेल. खरंतर, चांदीमध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म असतात की जे दुधाचे नैसर्गिक पद्धतीने दह्यात रूपांतरित करतात. दह्यातील अँटी बॅक्टेरियल आणि फर्मेंटेशन (आंबविण्याचे गुणधर्म)  या दोन्ही घटकांमुळे दही घट्ट आणि दाटसर तयार होते. दही घट्ट आणि दाटसर करण्याचा हा एक पारंपरिक उपाय मानला जातो. 

वाफाळत्या भातासोबत आंबट - गोड कैरीची कढी ! उन्हाळ्यातील स्पेशल मेन्यू - मन होईल तृप्त असा बेत...

२. सुक्या लाल मिरच्या :- विरजणाशिवाय घट्ट, दाटसर दही तयार करण्यासाठी आपण सुक्या लाल मिरच्यांचा देखील वापर करु शकतो. सर्वात आधी दूध व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर दूध थोडे कोमट थंड झाल्यावर दुधात २ ते ३ सुक्या लाल मिरच्या देटासहित घालाव्यात. मग भांड व्यवस्थित झाकून गरम, उबदार ठिकाणी ठेवावं, ५ ते ६ तासानंतर दही तयार झालेले असेल. 

मशिनशिवाय घरीच करा गाड्यावर मिळतो तसा उसाचा रस, थंडगार रसाची इन्स्टंट रेसिपी - वाटेल फ्रेश...

३. लिंबाचा रस :- लिंबाचा रस दुधात घालून दूध फाटून त्याचे पनीर तयार केले जाते. परंतु याच लिंबाच्या रसाचा वापर करून आपण दही देखील तयार करु शकतो. यासाठी दूध गरम करुन घ्यावे. मग हे दूध थोडे थंड होण्यासाठी ठेवावे. दूध कोमट झाल्यावर दुधात २ टेबलस्पून लिंबाचा रस मिसळावा. त्यानंतर हे भांडं झाकून उबदार ठिकाणी किंवा कॅसरॉल, कुकरमध्ये देखील ठेवू शकता. ४ ते ५ तासानंतर भांड्यात घट्ट, दाटसर दही तयार झालेल असेल. 

अशाप्रकारे दह्यासाठी विरजण नसेल तरीही आपण चांदीचं नाणं - अंगठी, सुक्या लाल मिरच्या किंवा लिंबाचा रस वापरुन देखील दही तयार करु शकतो.

Web Title: how to make market style thick curd at home The Secrets to Making the Perfect Homemade Dahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.