Join us  

थंडगार मसाला ताक करण्याची परफेक्ट रेसिपी; ताकात हा पदार्थ मिसळा-मठ्ठा पिऊन वाटेल फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 1:07 PM

How to Make Masala Chaas : या पद्धतीने ताक बनवल्यास तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल आणि चवही सुंदर येईल

ऊन्हाळ्याच्या (Summer Special Drink)दिवसांत तब्येत चांगली राहण्यासाठी लोक दही, ताक किंवा यापासून तयार झालेल्या पदार्थांचे सेवन करातत.  तर काहीजण बाहेरून मसाला ताक विकत घेऊन पितात. (How to Make Masala Chaas) घरच्याघरी विकतसारखं परफेक्ट ताक बनवणं एकदम सोपं आहे.  (Masala Chaas Recipe) घरी उपल्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही ताक बनवू शकता. (Masala Tak Recipe) त्यासाठी तुम्हाला फार  काही करावं लागणार नाही फक्त सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या पद्धतीने ताक बनवल्यास तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल आणि चवही सुंदर येईल. (How To Make Masala Tak At Home)

घरच्याघरी ताक बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Masala Tak Recipe)

१) दही- १ वाटी

२) भाजलेलं जीरं- १ टिस्पून

३) काळं मीठ- चवीनुसार

४) लाल तिखट- पाव टिस्पून

मसाला ताक कसे बनवायचे? (How to Make Masala Tak At Home)

1) सगळ्यात आधी तुम्ही किती लोकांसाठी ताक बनवणार आहात ते लक्षात घ्या. त्यानुसार दही एका वाडग्यात काढून घ्या.  जर तुम्ही १ ग्लास ताक बनवत असाल तर त्यात अर्धा ग्लास दही घाला त्याच प्रमाणात पाणी घाला. दही घुसळण्यासाठी तुमच्याकडे रवी किंवा ब्लेडर जे काही उपलब्ध असेल त्याचा वापर करून ताक बनवून घ्या.

सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा

2) मिक्सर जारमध्ये अर्धा ग्लास  दही आणि अर्धा ग्लास पाणी घेऊन फिरवून  घ्या. एक ग्लास घ्या, त्यात मिक्सरमधून फिरवून घेतलेलं ताक घाला. ताक थोडं वरून ग्लासात घाला. जेणेकरून ताकाला फेस येईल. यामुळे ताकाची चव आणखी वाढेल. भाजलेलं  जीरं, लाल तिखट घाला. 

मसाला ताक बनवण्याची दुसरी पद्धत

हे हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी पुदिन्याची पानं तोडून देठ वेगळे करा. त्यानंतर हिरवी मिरची  चिरा.  मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पानं, कोथिंबीर, चिरलेली हिरवी मिरची, अर्धा कप दही, जीरं पावडर आणि काळं मीठ घालून बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या. दही घातल्यानंतर मिश्रणात अतिरिक्त पाणी घालण्याची गरज लागणार नाही.

मांड्या-निंतब पसरट, जाड दिसतात? घरीच 5 सोपे व्यायाम करा, झटपट बारीक व्हाल-फिट दिसाल

ही स्मूद पेस्ट तयार झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून घ्या त्यात  उरलेलं दही, चवीनुसार मीठ आणि जवळपास अर्धा कप थंड पाणी घाला. त्यानंतर रवीच्या साहाय्य्याने व्यवस्थित ढवळून  घ्या.  ताकाचा फेस येईपर्यंत ताक घुसळून घ्या. तयार ताक सर्विंग ग्लासमध्ये  घाला. तुम्ही त्यात आईस क्युबही घालू शकता. ज्यामुळे ताक एकदम थंड लागेल. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स