Join us  

हॉटेलसारखा मसाला डोसा घरीच करण्याची सोपी रेसिपी- कुरकुरीत आणि चविष्ट डोसा खा पोटभर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 10:33 AM

How to make masala dosa : परफेफ्ट हॉटेलस्टाईल डोसे बनवण्यासाठी काही टिप्स वापरल्या तर जेवणाची चव वाढेल आणि नाश्ताही उत्तम होईल. (How to make masala dosa)

सकाळी नाश्त्याला दक्षिण भारतीय पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. इडली, डोसा, अप्पम सर्वांनाच खायला खूप आवडतं. पण नेहमी बाहेरून आणणं शक्य नसतं.  घरात बनवलेले डोसे हॉटेलसारख्या चवीचे बनत नाही. अशी अनेकींची तक्रार असते. परफेफ्ट हॉटेलस्टाईल डोसे बनवण्यासाठी काही टिप्स वापरल्या तर जेवणाची चव वाढेल आणि नाश्ताही उत्तम होईल. (How to make masala dosa)

सगळ्यात आधी एका कढईत तेल गरम करून त्यात १ चमचा मोहोरी, २ चमचा जीरं, १ चमचा कढीपत्ता, १ लाल मिरची, १ चिरलेली हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, कांदा, मीठ, हळद, लाल तिखट घालून फोडणी तयार करा. त्यात उकळून मॅश केलेला बटाटा घाला. हे मिश्रण एकजीव करून मंद आचेवर शिजू द्या त्यावर कोथिंबीर चिरून घाला. वरून एक लिंबू पिळा. (how to make dosa at home)

डोसा बनण्यासााठी १०० ग्राम उडीद डाळ आणि २०० ग्राम तांदूळ भिजवा. ४ तासांसाठी डाळ, तांदूळ भिजवण्यासाठी ठेवा. एका ब्लेंडरमध्ये  डाळ आणि तांदूळ वाटून घ्या. ८ तासांसाठी हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवा. पीठ आंबल्यानंतर त्यात सोडा, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या. तव्याला तेल लावून त्यावर गोलाकार डोसा पसरवून घ्या आणि डोसा अर्धवट शिजल्यावर तयार बटाट्याची भाजी घाला. डोसा दुमडून खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसह सर्व्ह करा. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स