लहान मुलं दूध प्यायचं म्हटलं की नाक मुरडतात. (What To Do When Your Child Won’t Drink Milk) घरातील लहान मुलांना दूध प्यायला लावणे हाच पालकांसाठी खूप मोठा टास्क असतो. कित्येक पालकांना (What to Do if Your Toddler isn’t Drinking Milk) आपण मुलांच्या मागे दुधाचा ग्लास घेऊन पळताना पाहिले असेल. असे असले तरीही हीच मुलं बाजारांतून विकत आणलेली प्रोटीन पावडर, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड मिल्क किंवा वेगळ्या चवीचे दुधाचे मसाले घालून अगदी क्षणार्धात दुधाचा ग्लास रिकामी करतात. अशावेळी मुलांना बाजारांतून विकत आणलेल्या या आर्टिफिशियल, वेगवेगळ्या रंगाच्या प्रोटीन पावडर दुधात घालून देण्यापेक्षा आपण घरच्या घरीच मुलांसाठी पौष्टिक प्रोटीन पावडर बनवू शकतो.
बाजारांत विकत मिळणाऱ्या आर्टीफिशियल प्रोटीन पावडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम घटक व भरपूर साखरेचा वापर केलेला असतो, जे मुलांच्या दृष्टीने हानिकारक असते. अशा परिस्थितीत ड्रायफ्रूट्सचा वापर करून आपण घरच्या घरी मिल्क मसाला पावडर (Milk Masala Powder Recipe) बनवू शकतो. हा अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि सहज तयार होणारा मसाला घरी बनवण्यासाठी शेफ मेघनाने एक रेसिपी शेअर केली आहे(How to make Masala Milk Powder Recipe).
साहित्य :-
१. काजू - १/४ कप २. पिस्ता - १/४ कप ३. बदाम - १/४ कप ४.वेलची पूड - १ टेबलस्पून ५. जायफळ पूड - १ टेबलस्पून ६. बडीशेप - १ टेबलस्पून ७. काळीमिरी - ८ ते १० ८. साखर - १/२ टेबलस्पून ९. केशर - १/२ टेबलस्पून १०. सुंठ पावडर - १/२ टेबलस्पून ११. मिल्क पावडर - दिड टेबलस्पून (पर्यायी)
गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!
कृती :-
१. सर्वप्रथम काजू, बदाम, पिस्ता एकत्रित करून हलकेच पॅनमध्ये कोरडे भाजून घ्यावे. २. काजू, बदाम, पिस्ता हलकेच भाजून घेतल्यानंतर ते थोडे थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यावेत. ३. आता एका मिक्सरच्या भांड्यात वेलची पूड, जायफळ पूड घेऊन त्यात काळीमिरीचे दाणे, बडीशेप घालावी त्यानंतर थोडीशी साखर घालावी.
विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...
भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...
४. मिक्सरमध्ये एकत्रित केलेल्या या मिश्रणाची बारीक पूड करून घ्यावी, ही पूड नंतर एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी. ५. आता याच मिक्सरच्या भांड्यात कोरडे भाजून घेतलेले काजू, बदाम, पिस्ता घालून थोडीशी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावे. ६. त्यानंतर हे मिश्रण बाऊलमध्ये काढून घ्यावे. आधी तयार करून घेतलेली पूड व ड्रायफ्रूटची पूड दोन्ही एकत्रित करून घ्यावे. ७. या तयार झालेल्या मसाल्यामध्ये आपण सुंठ पावडर, केशर, मिल्क पावडर (पर्यायी) घालून चमच्याने ढवळून एकजीव करु शकता.
मिल्क पावडर. आता एका हवाबंद डब्यात ही पावडर भरा, आणि कोरड्या जागी बरणी ठेवा.