Join us  

Masala Pav Recipe : नाश्त्याला ५ मिनिटात करा चमचमीत, सुपरटेस्टी मसाला पाव; करायला सोपा, खायला भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 5:42 PM

How to make Masala Pav :

संध्याकाळच्यावेळी चहाबरोबर काहीतरी खाण्याची इच्छा सर्वांचीच होते. नेहमी नेहमी चहा बिस्किट्स किंवा फरसाण  खाऊनही कंटाळा येतो. काहीतरी चटपटीच खावंसं वाटतं पण नेहमीच हॉटेलला जायला वेळ मिळतोच असं नाही. घरच्याघरी मोजक्या साहित्याचा वापर करून तुम्ही मसाला पाव बनवू शकता. (How to make Masala Pav) मसाला पाव तयार करण्यासाठी तुम्हाला पावभाजी मसाला आणि कांदा, टोमॅटो असं बेसिक साहित्य लागेल. (Cooking Tips & Tricks)

मसाला पाव करण्याची रेसेपी (Masala Pav Recipe)

४ पाव

१/२ कप  चिरलेला कांदा

१/२ कप चिरलेला  टोमॅटो, 

१/२ कप शिमला मिरची

१ टि स्पून आले लसूण मिरची पेस्ट 

बटर चवीनुसार 

२ टीस्पून पाव भाजी मसाला 

१ चमचा लाल तिखट, हळद, मीठ

कृती

1) एका तव्यात  १ चमचा बटर गरम करून त्यात आले लसूण मिरची पेस्ट घालून वास  येईपर्यंत शिजवा. 

2) आता त्यात १-२ मिनिटांच्या अंतराने कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घाला आणि चमच्यानं ढवळत राहा.

3) लाल तिखट, पावभाजी मसाला, हळद आणि मीठ असे कोरडे मसाले घाला.

4) आता साधारण दीड कप पाणी घाला म्हणजे सर्व साहित्य चांगले शिजले जाईल.

5) पाणी सुकल्यावर त्याता पाव घालून परवून घ्या. 

6) पावमधोमध कापून मग फ्राय करा. 

7) शेकल्यानंतर पावावर एक चमचा मसाला पसरवा. 

8) आता त्यावर कांदा, कोथिंबीर घालून सजवा आणि लिंबू पिळा आणि मसाला पावचा आनंद घ्या

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न