Join us  

कुकरमध्ये १० मिनिटांत करा मऊ-मोकळा मसाला पुलाव; सोपी रेसिपी, साध्या जेवणाची वाढेल रंगत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 3:49 PM

How to Make Masala Pulao in Cooker : घरी उपलब्ध असलेलं साहित्य वापरून तुम्ही अगदी ५ ते १० मिनिटांत कुकरमध्ये पुलाव बनवू शकता.

नेहमी नेहमी सारख्या चवीचा वरण भात खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. (Cooking Tips) बिर्याणी किंवा पुलाव बनवण्यासाठी तसंच अजून वेगळे पदार्थ ट्राय करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे बाहेरून आणलेले पदार्थ खाल्ले जातात अनेकजण घरी पदार्थ बनवणं टाळतात.(How to make masala pulao)  घरी उपलब्ध असलेलं साहित्य वापरून तुम्ही अगदी ५ ते १० मिनिटांत कुकरमध्ये पुलाव बनवू शकता. ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. (How to Make Masala Pulao in Cooker)

कुकरमध्ये मसाला पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी 

1) पुलाव बनवण्यासाठी दीड कप बासमती तांदूळ घ्या. तांदूळ २ ते ३ वेळा पाण्यात धुवून घ्या. धुतल्यानंतर २० मिनिटांसाठी हे तांदूळ भिजवून ठेवा. यापेक्षा जास्त भिजवून ठेवू नका. अन्यथा पुलाव गचगचीत होऊ शकतो. गॅसवर कुकर ठेवा त्यानंतर त्यात २ मोठे चमचे साजूक तूप घाला. तुपामुळे पुलावचा सुंगध चांगला येतो.

2) त्यानंतर यात २ चमचे तेल घाला. कॉम्बिनेशनमुळे पुलावला चांगली शाईन येईल.  तुपात यात खडा मसाला घाला. तमालपत्र, दगडीफूल, लवंग, वेलची, दालचिनी घाला. त्यात लांब चिरलेला कांदा घाला. कांद्याला रंग आल्यानंतर त्यात मीठ, हिंग आणि चिरलेली मिरची घाला. दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवा.

3) त्यानंतर यात बटाटे, गाजर, शिमला मिरची, मटार  यांसह तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. त्यात अर्धा कप फेटलेलं दही घाला. दही घालून पुन्हा एकदा भाज्या शिजवून घ्या. त्यात लाल मिरची पावडर, जीरं पावडर, धणे पावडर, गरम मसाला, हळद, मीठ घालून एकजीव करून घ्या.  त्यात भिजवलेले तांदूळ घाला. मग तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी घालून एकजीव करा.

4)  यात अर्धा लिंबू पिळून घाला. लिंबामुळे तांदूळ मोकळा शिजण्यास मदत होते. त्यानंतर झाकण लावा. मिडीयम हाय  फ्लेमवर १ शिट्टी घ्या आणि गॅस कमी करून अजून एक शिट्टी घ्या नंतर गॅस बंद करा. पूर्ण वाफ बाहेर निघाल्यानंतर कुकर उघडा. तयार आहे मऊ मोकळा मसाला पुलाव. रायता किंवा लोणच्याबरोबर तुम्ही हा पुलाव खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती