Join us  

फक्त १० मिनिटात तयार होते स्टफ खारी, नेहमीच्या खारीला द्या एक चविष्ट ट्विस्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2023 6:02 PM

How to make Masala Stuffed Khari Recipe ना गॅस ना ओवन, स्टफ खारी बनते अवघ्या १० मिनिटात..

सायंकाळच्या चहासोबत अनेक जण बिस्कीट, खारी, टोस्ट, ब्रेड - बटर असे पदार्थ खातात. हे पदार्थ आपण लहानपणीपासून खात आलो आहे. सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी चहा किंवा चाट खातो. दरम्यान, चाट खाण्यासाठी आपण बाहेर पडतो. चहा किंवा चाट या दोन्हीपैकी एक ऑप्शन आपण निवडतो. मात्र, दोन्ही ऑप्शन एकाच पदार्थात मिक्स झाले तर.. आपण चहासोबत चाट खाऊ शकत नाही. मात्र, खारीपासून एक नमकीन चाट नक्कीच बनवू शकतो.

स्टफ खारी ही रेसिपी १० मिनिटांच्या आत रेडी होते. ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. आपण हा पदार्थ चहासोबत नक्कीच खाऊ शकता,  नेहमीच्या खारीला आपण चाटचा हटके ट्विस्ट देऊन एक आगळी - वेगळी रेसिपी तयार करू शकता. चला तर मग या हटके चमचमीत पदार्थाची कृती पाहूयात(How to make Masala Stuffed Khari Recipe)..

स्टफ खारी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

खारी

बारीक चिरलेला कांदा

रंगी- बेरंगी ढोबळी मिरची

शेजवान चिली गार्लिक सॉस

मेयोनेज

पिझ्झा सिज्निंग

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, एका प्लेटमध्ये खारी घ्या. खारी मऊ नसून कुरकुरीत हवी. त्या खारीमध्ये सुरी अथवा चमचाच्या मदतीने मधोमध गोल आकार तयार करा. एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, रंगी - बेरंगी सिमला मिरची, शेजवान चिली गार्लिक सॉस, मेयोनेज, पिझ्झा सिज्निंग घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा.

उलटा वडा पाव? हा कोणता नवीन पदार्थ, पाहा रेसिपी आणि बघा आवडतो का तुम्हाला हा पदार्थ..

हे मिश्रण तयार झाल्यानंतर खारीमध्ये भरा. सजावटीसाठी खारीवर कोथिंबीर पसरवा. अशा प्रकारे चमचमीत स्टफ खारी खाण्यासाठी रेडी. ही झटपट तयार होणारी रेसिपी कमी साहित्यात बनते. बच्चे कंपनीसह थोरा - मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ही रेसिपी चहासोबत खायला नक्की आवडेल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स