Join us

फक्त कपभर मटारचे करा चविष्ट धिरडे, हिवाळ्यातला झटपट पौष्टिक हिरवागार कुरकुरीत नाश्ता-सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2024 18:21 IST

How To Make Matar Danyanche Dhirde At Home : Matar Danyanche Dhirde : Winter Special Matar Dana Recipe : हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्यागार मटार दाण्यांचे धिरडे करण्याची सोपी रेसिपी...

थंडीच्या दिवसांत बाजारामध्ये हिरवेगार, टप्पोरे, गोड चवीचे मटार (Matar Recipe) अगदी सहज विकत मिळतात. इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा हिवाळ्यात मटार तुलनेने फ्रेश आणि हिरवेगार असतात. हिवाळ्यात मिळणाऱ्या मटारची चव इतर वर्षभर मिळणाऱ्या मटारच्या दाण्यांना अजिबात नसते. यासाठीच (Winter Special Matar Dana Recipe) आपण या दिवसांत बाजारांत फ्रेश, हिरवेगार मटार (How To Make Matar Danyanche Dhirde At Home) दिसले की लगेचच विकत घेतो. हिवाळ्यात मिळणाऱ्या या फ्रेश मटार पासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करु शकतो. हिरवे मटार वापरुन आपण मटार करंजी, मटार उसळ, मटार पुलाव, मटार बटाटा रस्सा भाजी असे अनेक चविष्ट आणि रुचकर पदार्थ तयार करतोच(Matar Danyanche Dhirde).

हिवाळ्याच्या दिवसांत आपलीही भूक वाढलेली असते आणि खाल्लेले चांगले पचते त्यामुळे आपल्याला वेगवेगळे, चमचमीत काहीतरी खावेसे वाटते. अशावेळी आपणं या हिरव्यागार मटारच्या दाण्यांपासून मस्त कुरकुरीत, खुसखुशीत असे मटार दाण्यांचे धिरडे घरच्याघरीच करु शकतो. सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा मधल्या वेळच्या भुकेसाठी आपण झटपट तयार होणारा मटार दाण्यांचा खास टेस्टी असा पदार्थ करु शकतो. मटार दाण्यांचा वापर करून धिरडे कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात.    

साहित्य :- 

१. हिरवे मटार - २ कप २. कोथिंबीर - १/२ कप ३. लसूण पाकळ्या - ६ ते ७ पाकळ्या ४. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या ५. कडीपत्ता - १/२ कप ६. आलं - १/२ इंचाचा लहान तुकडा ७. बारीक रवा - १/४ कप ८. पाणी - गरजेनुसार ९. मीठ - चवीनुसार १०. तांदुळाचे पीठ - १/४ कप ११. तेल - गरजेनुसार 

जान्हवी कपूर हिवाळ्यात आवडीने खाते रताळ्याचा ' हा ' खास पदार्थ, वजन होते कमी - पचनही सुधारते...

हिरवेगार मटार आणि कोवळी मेथीची पाने... मग काय हिवाळ्यात मेथी मटारचा बेत तर व्हायलाच हवा...

कृती :- 

१. सर्वातआधी मिक्सरच्या एका भांड्यात हिरवे मटार घेऊन त्यात कोथिंबीर, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, आलं आणि गरजेनुसार थोडस पाणी घालावे. २. आता मिक्सरमधील सगळे जिन्नस एकत्रित वाटून त्याचे पातळसर बॅटर तयार करून घ्यावे. ३. मिक्सरमधील वाटून घेतलेल बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. ४. या बाऊलमधील बॅटरमध्ये बारीक रवा, तांदुळाचे पीठ व चवीनुसार मीठ घालावे. 

५. गरज वाटल्यास या तयार बॅटरमध्ये गरजेनुसार पाणी घालावे. तांदुळाच्या घावण्याला तयार करतो तसे एकदम पातळ कन्सिस्टंन्सीचे बॅटर धिरड्यांसाठी  तयार करून घ्यावे. ६. आता पॅन गरम करून त्यावर थोडेसे तेल सोडून घ्यावे. चमच्याच्या मदतीने हे धिरड्याचे बॅटर गोलाकार आकारात सोडून चमच्याने पसरवून घ्यावे. मग या धिरड्याच्या चारही बाजुंनी तेल सोडून तो दोन्ही बाजुंनी व्यवस्थित भाजून घ्यावा. 

थंडीच्या मोसमात मिळणाऱ्या हिरव्यागार मटार दाण्यांचे गरमागरम कुरकुरीत धिरडे खाण्यासाठी तयार आहे. हिरव्या चटणी किंवा सॉस सोबत हे मटार दाण्यांचे धिरडे खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळ्यातला आहारकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.