Join us  

उन्हाळ्यातही चारच्या चहासोबत खासच लागते मटार कचोरी, रेसिपी सोपी आणि चटकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 2:54 PM

How To Make Matar Kachori At Home : ताजेच नाहीतर फ्रोजन मटार वापरुनही मटार कचोरी करता येते, चहाचा परफेक्ट पार्टनर

खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी 'कचोरी' ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ असे असतात जे आपल्याला खायला खूपच आवडतात. कचोरी हा त्यापैकी एक खास पदार्थ आहे. कचोरी हा भारतीयांच्या आवडता टी टाइम स्नॅक्स आहे. सणासुदीच्या काळात, संध्याकाळी चहासोबत, किंवा पार्टीमध्ये कचोरी हा पदार्थ हमखास दिला जातोच. कचोरी हा पदार्थ गोल पोकळ तळलेल्या पुरी सारखा टम्म फुगलेला आणि त्यात वेगवेगळ्या मसाल्यांचे चटकदार सारण भरले जाते. 

आपल्यापैकी बऱ्याचजणांना कचोरी बाहेरच्या सारखी घरी देखील बनवता येते यावर विश्वास बसत नाही. खरंतर आपण हलवाईंच्या दुकानात मिळणाऱ्या कचोरी सारखी खमंग, खुसखुशीत कचोरी घरच्या घरी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आज भारतभर कचोरी हा पदार्थ कुठेही खायला मिळतो. काही ठिकाणी त्यात घातले जाणारे जिन्नस वेगळे असतील, परंतु कचोरीची आंबट, गोड, तिखट चव कायम तीच असते. घरच्या घरी टी टाइम स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी आपण मटार कचोरी झटपट बनवू शकतो(How To Make Matar Kachori At Home).

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - २ कप २. तेल - ४ ते ५ टेबलस्पून ३. जिरे - १ टेबलस्पून ४. हिंग - १/२ टेबलस्पून ५. कढीपत्ता -  ६ ते ८ ६. हिरवेगार मटार - ३ कप ७. ओलं खोबर - १ कप ८. साखर - १ टेबलस्पून ९. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून १०. गरम मसाला - १ टेबलस्पून ११. मीठ - चवीनुसार १२. बारीक चिरलेली कोथिंबीर - १ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम गव्हाचे पीठ योग्य त्या प्रमाणांत तेल आणि पाणी घालून चपात्यांच्या कणकेसारखे मळून घ्यावे. २. आता या मळून घेतलेल्या पिठावर एक ओला करुन घेतलेला कॉटनचा रुमाल घालून पीठ व्यवस्थित झाकून ठेवावे. ३. त्यानंतर निवडून घेतलेले मटार मिक्सरला लावून त्याची थोडी जाडसर भरड करुन घ्यावी. ४. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता यांची फोडणी तयार करून घ्यावी. 

फक्त ५ मिनिटात होणारे बटाट्याचे क्रिस्पी काप, पदार्थ सोपा पण रोजच्या जेवणाला देतो नवा चमचमीतपणा...

कैरीचा आंबटगोड पुलाव, करायला अगदी सोपा आणि उन्हाळ्यात खायचे सुख, शेफ कुणाल कपूरची रेसिपी...

५. आता या फोडणीमध्ये मटारची मिक्सरमध्ये करुन घेतलेली भरड, ओलं खोबर, चवीनुसार मीठ, गरम मसाला, साखर, हिरव्या मिरचीची पेस्ट, बारीक चिरुन घेतलेली कोथिंबीर असे सगळे जिन्नस एकत्रित करुन घ्यावे. ६. आता कणकेच्या पिटाचे छोटे गोळे करुन ते पुरीच्या आकारात लाटून घ्यावेत. या पाऱ्या लाटून घेतल्यानंतर त्यात मटारचे सारण भरुन मोदकाच्या आकाराच्या काळ्या बनवून मग त्याचे तोंड वरुन बंद करून घ्यावे. ७. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात या मटार कचोरी खरपूस तळून घ्याव्यात. 

या मटार कचोरी सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.

टॅग्स :अन्नपाककृती