सँडविच म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा खास पदार्थ. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सँडविच हा वीक पॉईंट असणारा असा पदार्थ आहे. सँडविच हा एक असा पदार्थ आहे की जो आपण सकाळच्या ब्रेकफास्टपासून (How To Make Matar Toast Sandwich At Home) ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. सॅन्डविचचे असंख्य वेगवेगळे प्रकार आणि फ्लेवर्स असतात. अनेक पौष्टिक भाज्यांचे फिलिंग असणारे हे सँडविच चवीला खूपच छान लागते(No Bread Matar Toast Sandwich).
थंडीत बाजारात आवळे, गाजर, सिताफळ, मटार, पालेभाज्या, फळं असं सगळंच मोठ्या प्रमाणात येतं. यामध्ये आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा हिरवागार मटार. एरवी आपल्याला मटार वापरायचा असेल तर फ्रोजन मटार किंवा वाटाणे वापरावे लागतात. पण थंडीच्या काळात ताजा मटार मिळत असल्याने घरोघरी मटारचे एकाहून एक चविष्ट (Crispy Matar Sandwich) पदार्थ केले जातात. यामध्ये मटार भात, मटार कटलेट, मटार करंजी, मटार उसळ असे बरेच पदार्थ केले जातात. थंडीत भूक वाढते त्याचप्रमाणे गारठा असल्याने गरमागरम खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण ब्रेडचा वापर न करता देखील 'नो ब्रेड मटार टोस्ट सँडविच' घरच्याघरीच तयार करु शकतो. मटार वापरुन 'नो ब्रेड मटार टोस्ट सँडविच' कसे करायचे याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. हिरवे मटार - २ कप२. कोथिंबीर - ३ ते ४ टेबलस्पून ३. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या ४. बारीक रवा - १ कप५. ऑरेगानो - १ टेबसलस्पून ६. मीठ - चवीनुसार७. पाणी - १/२ कप८. लाल - पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरच्या - प्रत्येकी १/२ कप ९. कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला) १०. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून ११. चीज - २ टेबलस्पून (किसलेले चीज)१२. बेकिंग सोडा - १/४ टेबलस्पून १३. साजूक तूप / बटर - २ ते ३ टेबलस्पून
फक्त कपभर मटारचे करा चविष्ट धिरडे, हिवाळ्यातला झटपट पौष्टिक हिरवागार कुरकुरीत नाश्ता-सोपी रेसिपी...
जान्हवी कपूर हिवाळ्यात आवडीने खाते रताळ्याचा ' हा ' खास पदार्थ, वजन होते कमी - पचनही सुधारते...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात हिरवे मटार, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घेऊन ते एकत्रित वाटून घ्यावे. (हे मिश्रण वाटून घेताना त्याची एकदम पातळसर पेस्ट न करता थोडे जाडसर भरड होईल असेच मिश्रण वाटून घ्यावे). २. आता हे मिक्सर जार मधील मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर त्यात बारीक रवा, ऑरेगानो, चवीनुसार मीठ व पाणी घालून हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. हे सँडविच बॅटर तयार झाल्यावर १० ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्यावे. ३. एका बाऊलमध्ये आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळी मिरच्या बारीक कापून घ्याव्यात. त्यात बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, चीज घालून सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. (या सँडविचच्या आतील फिलिंग मध्ये आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बारीक चिरुन देखील घालू शकता).
४. आता मिक्सरजार मध्ये वाटून घेतलेले सॅन्डविचचे झाकून ठेवलेले बॅटर घेऊन त्यात बेकिंग सोडा व थोडेसे पाणी घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. ५. आता टोस्टरच्या भांड्याला साजूक तूप किंवा बटर लावून त्यावर हे सँडविचचे तयार बॅटर पसरवून त्याचा ब्रेड प्रमाणे एक मोठा थर करुन घ्यावा. त्यानंतर त्यावर ढोबळी मिरचीचे फिलिंग पसरवून घालावे. व परत सँडविचचे तयार बॅटर ब्रेड प्रमाणे पसरवून घालावे. ६. आता टोस्टरमध्ये हे सँडविच ८ ते १० मिनिटे ठेवून दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे.
आपले नो ब्रेड मटार टोस्ट सँडविच खाण्यासाठी तयार आहे. हिरवी चटणी किंवा सॉस सोबत हे मटार टोस्ट सँडविच खाण्यासाठी सर्व्ह करावे. सकाळचा ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळी टी - टाईमच्या वेळी भूक लागली तर आपण हे हेल्दी पौष्टिक सँडविच खाऊ शकतो.