Join us  

विकतचं-केमिकल असलेलं मेयोनिज खाण्यापेक्षा १० मिनिटांत घरीच तयार करा मेयोनिज, मिळेल भरपूर प्रोटीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 9:07 AM

How To Make Mayonnaise At Home: घरच्याघरी फक्त १० मिनिटांत कोणतेही केमिकल्स न वापरता अगदी घरगुती पदार्थ वापरून मेयोनिज कसं तयार करायचं पाहा... (simple recipe of making mayonnaise in just 10 minutes)

ठळक मुद्देयाची चव तर उत्तम आहेच. पण त्यामध्ये विकतच्या मेयोनिजच्या तुलनेत प्रोटीन्स जास्त प्रमाणात आहेत. शिवाय फॅट्स आणि कॅलरीही खूप कमी आहेत.

मेयोनिज हा अनेक जणांचा अतिशय आवडीचा पदार्थ. लहान मुलंही ते अगदी आवडीने खातात. सॅण्डविच, पराठा, पोळी, ब्रेड, बर्गर अशा अनेक पदार्थांसोबत मेयोनिज खाता येतं. त्यामुळे महिन्याच्या सामानाच्या यादीत अनेक जणांनी टोमॅटो सॉससोबत मेयोनिजही लिहिलेलं असतंच. पण विकत मिळणाऱ्या मेयोनिजमध्ये केमिकल्स, प्रिझर्व्हेटिव्ह, फॅट, कॅलरी खूप जास्त प्रमाणात असतात. हे सगळे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. त्यामुळेच असं विकत मिळणारं केमिकलयुक्त मेयोनिज खाण्यापेक्षा घरीच अगदी सोप्या पद्धतीने आणि अवघ्या काही मिनिटांतच मेयोनिज कसं करायचं ते पाहा.. याची चव तर उत्तम आहेच (how to make mayonnaise at home). पण त्यामध्ये विकतच्या मेयोनिजच्या तुलनेत प्रोटीन्स जास्त प्रमाणात आहेत. शिवाय फॅट्स आणि कॅलरीही खूप कमी आहेत. (simple recipe of making mayonnaise in just 10 minutes)

 

मेयोनिज तयार करण्याची रेसिपी 

साहित्य

अर्धा लीटर दूध

राधिका मर्चंटच्या विंटेज ड्रेसपेक्षा सातपट महाग आहे तिची पर्स, बघा या दोन्ही वस्तूंची खासियत....

अर्ध्या लिंबाचा रस

लसूणाच्या १ किंवा २ पाकळ्या

१ टीस्पून मीठ

 

कृती

१. सगळ्यात आधी दूध गॅसवर उकळायला ठेवा. दुधाला जेव्हा उकळी येईल तेव्हा त्यामध्ये लिंबू पिळा..

२. लिंबू पिळल्यानंतर पुन्हा काहीवेळ दूध उकळायला ठेवा. हळूहळू दूध फाटेल आणि दूधाचा घट्ट पदार्थ वेगळा होईल. असे झाले की गॅस बंद करा.

बिर्याणीच्या नावाखाली भलताच गोंधळ, आंब्याचा रस घालून केलेली आमरस बिर्याणी पाहून नेटिझन्स म्हणाले....

३. दूध जेव्हा थंड होईल तेव्हा घट्ट झालेले दूध मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यामध्येच लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ आणि घट्ट दूध वेगळं होऊन पातेल्यात जे दुधाचं पाणी राहीलं असेल ते पाणी पाव वाटी टाका. 

४. यानंतर सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. अगदी विकतच्यासारखं चवदार मेयोनिज झालं तयार.. विकतच्या मेयोनिजपेक्षा हे मेयोनिज नक्कीच पौष्टिक आणि केमिकल्स फ्री आहे. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.