Join us  

झटपट खमंग मेदूवडे करण्यासाठी ३ ट्रिक्स; मेदूवडा कधी बिघडणार नाही तेलकटही होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 1:36 PM

How to make medu vada batter : मेदूवडे कुरकुरीत बनवण्यासाठी तुम्ही एक युक्ती फॉलो करू शकता. यासाठी गॅसवर कढईत तेल तापल्यावर लगेच मेदू वड्याचे पीठ घालू नका, तेल तापू द्या.

नाश्त्याला खायला मेदू वडा हा दक्षिण भारतीय पदार्थ सर्वांनाच आवडतो. कितीही ठरवलं तरी बाजारासारखे मेदू वडे घरी बनत नाहीत अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. मेंदूवडा खायला कुरकुरीत, खमंग असतात. या पदार्थाची रेसिपी सुद्धा तितकीच सोपी आहे. (Medu Vada Recipe South Indian Breakfast Food) डाळी आपल्या सर्वांच्याच घरी असतात.  (Cooking Hacks) याच डाळींचा वापर करून तुम्ही मेंदूवडा बनवू शकता. घरच्याघरी सोप्या पद्धतीनं मेदूवडा बनवण्याची रेसेपी पाहूया. (How to make medu vada)

- मेदू वड्याचं बॅटर तयार करताना पाण्याच्या आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून बॅटर एकत्र करा.  यामुळे बॅटर  जास्त पातळ होणार नाही. शेवटी मीठ आणि पाणी घालून एकत्र करा. कारण  मीठ जर आधी घातलं तर मिश्रणाला पाणी सुटेल.

गुढी पाडव्याला सौंदर्य वाढवतील १० खास मराठमोळे दागिने; अभिमानाने अंगाखाद्यावर मिरवायला हवे हे सुंदर साज

- मेदू वडा फ्राय करण्यासाठी वापरलेल्या तेलाचा वापर करू नका. वापरलेलं तेल तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. यासह ही रंग आणि चव दोन्ही बिघडवेल. 

कंगवा फिरवताच केस तुटतात? या ‘खास’ घरगुती तेलानं १० मिनिटं करा मसाज करा; केस गळती बंद

-  मेदूवडे कुरकुरीत बनवण्यासाठी तुम्ही एक युक्ती फॉलो करू शकता. यासाठी गॅसवर कढईत तेल तापल्यावर लगेच मेदू वड्याचे पीठ घालू नका, तेल तापू द्या. यासाठी गॅसची आच जास्त ठेवा, मेदू वडा टाकताच, 2 मिनिटांनी गॅस कमी करा, आता चांगले तळून घ्या. दोन्ही बाजू तपकिरी झाल्यावर प्लेटमध्ये काढा. प्लेटवर टिश्यू पेपर वापरा, ते अतिरिक्त तेल शोषून घेते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न