Join us  

१ थेंबही तेल न वापरता करा हॉटेलसारखा मेदूवडा; सोपी रेसिपी- सुपरटेस्टी बनतील वडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 5:33 PM

How to Make Medu Vada Without Oil : स्वंयपाकघरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही  कुरकुरीत वडे बनवू शकता. 

ज्यांना रोजच्या आहारात तेलकट खाणं फारसं आवडत नाही त्यांनी  बिना तेलाचे मेदू वडे ट्राय करायला हवेत. (Medu Vada Making Tips) ते मेदू वडे बनवायला तुम्हाला फार वेळ लागणार नाही कमीत कमी वेळात उत्तम नाश्ता बनून तयार होईल. बिना तेलाचे मेदूवडे करण्याची सोपी रेसिपी पाहूया. स्वंयपाकघरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही  कुरकुरीत वडे बनवू शकता. (How To Make Medu Vada  Without Oil)

बिना तेलाचे मेदू वडे कसे करायचे? (No Oil Medu Vada Recipe)

1) वडे बनवण्यसाठी दीड कप उदीडाचा डाळ ४ ते ५ तास भिजवण्यासाठी ठेवा. ही डाळ उपसून मिक्सरच्या भांड्यात  घाला. यात १ इंच आल्याचा तुकडा, धणे,आणि  बर्फाचे २ तुकडे घालून डाळ बारीक करून घ्या. 

2) बर्फ घातल्याने डाळ चांगली बारीक होते आणि मिक्सर खराबही होत नाही.  डाळ बारीक वाटून पेस्ट तयार करा ही पेस्ट एका  भांड्यात काढून घ्या.

3) यात चिरलेली कोथिबीर,  हिंग, चिरलेला ओला नारळ, कढीपत्ता घालून व्यवस्थित फेटून घ्या. ८ ते १० तासांसाठी वडे फेटून घ्या.  त्यानंतर वड्यांचा एक छोटा गोळा घेऊन  पाण्यात घालून पाहा. पाण्यात हा गोळा तरंगला म्हणजे पीठ व्यवस्थित तयार झालं आहे. 

महिन्याभरात केस १ इंचही वाढत नाहीत; बायोटीनयुक्त ५ पदार्थ खा, लांबचलांब-दाट होतील केस

4) यात तांदूळाचे पीठ आणि मीठ घालून एका हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्या, झाकण ठेवून या मिश्रण बाजूला ठेवा. त्यात इनो घालून मिश्रण एकजीव करा त्यानंतर वडे पायपिंग बॅगमध्ये घाला.  एका चाळणीवर  वड्यांच्या आकाराचे मिश्रण तोडून ठेवा. एको मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. 

पोट लटकतं-दंड जाड दिसतात? डॉक्टर सांगतात ८०-१०-१० चा खास फॉम्यूला, झरझर घटेल चरबी

5) पाणी गरम झाल्यानंतर त्यावर वड्यांची गाळणी ठेवा. त्यावर झाकण ठेवून ७ ते ८ मिनिटांसाठी शिजवून घ्या. तयार वडे तुम्ही शेलो फ्राय करू शकता किंवा चटणी, सांबारबरोबर असेच खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न