Join us  

उरलेल्या भाताचे १० मिनिटांत करा खमंग मेदूवडे; झटपट बनतील कुरकुरीत वडे, पाहा सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 2:48 PM

How to Make Meduvada from Leftover Rice : भाताचे गरमागरम मेदूवडे बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.

शिल्लक राहिलेला भात फेकला जाऊ नये म्हणून  फोडणीचा भात बनवला जातो. (Cooking Hacks) अनेकांना उरलेला भात खायला खूप आवडतो. भात कितीही मऊसूत, दाणेदार शिजला असेल थोड्यावेळाने भात कडक होतोच. (Leftover Rice to Crispy Vada) अशावेळी शिल्लक राहिलेला भात दुसऱ्या दिवशी नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला खाल्ला जातो. नेहमी नेहमी तेच तेच न खाता तुम्ही भाताचे गरमागरम मेदूवडे बनवून खाऊ शकता.  भाताचे गरमागरम, खमंग  मेदूवडे बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Medu Vada from Leftover Rice)

साहित्य (How to make Medu Vada)

१) शिल्लक राहिलेला भात -१ वाटी

२) रवा- १ वाटी

३) दही- १ वाटी

४) किसलेले  गाजर - १वाटी

५) बारीक चिरलेल्या शिमला मिरच्या -  १ वाटी

६) कढीपत्त्याची पानं-  ८ ते १०

७) आल्याचे तुकडे - ५ ते ६

८) बारीक चिरलेला कांदा - १

९) तेल - तळण्यासाठी

१०) जीरं- १ ते २ चमचे

११) मीठ- चवीनुसार

भाताचा मेदूवडा बनवण्याची कृती (How to make Medu Vada from Leftover Rice)

१)  भाताचे वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात उरलेला भात काढा. त्यात वाटीभर रवा घाला आणि  वाटीभर दही घाला. 

२) मीठ घालून हे साहित्य व्यवस्थित दळून घ्या. जाडसर दळलेली पेस्ट एका वाडग्यात काढून घ्या. त्यात जीरं, बारीक चिरलेल्या मिरच्या, आल्याचे बारीक तुकडे घाला. यात शिमला मिरची, कांदे, गाजराचा किस, कढीपत्ता घाला. हे मिश्रण थोड्यावेळासाठी झाकून बाजूला ठेवा. (Instant Rice Medu Vada)

१० रूपयांचा बिस्कीट पुडा घ्या घरी करा स्वादीष्ट गुलाबजाम, मावा-मैदा न घालताच बनतील परफेक्ट

३) त्यानंतर हाताला पाणी लावून वड्यांच्या मिश्रणाचे बारीक वडे तयार करून घ्या.  वड्यांना योग्य आकार देण्यासाठी तुम्ही चहाच्या गाळणीचा वापर करू शकता.

४)  चहाच्या गाळणीला मागच्या बाजूने पाणी लावून मग त्यावर वड्यांचे पीठ घाला आणि मध्ये छिद्र तयार करून घ्या.  एका कढईत तेल गरम करून त्यात मेदूवडे गोल्डन, लाल होईपर्यंत खरपूस तळून घ्या.

डाळ-तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला; डोश्याचं पीठ मस्त फुलेल, सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे

५) हे मेदूवडे तुम्ही खोबऱ्याची चटणी, सांबार किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. उरलेल्या भातात रव्याबरोबर भिजवलेली पिवळी मुगाची डाळही घालू शकता.  जेणेकरून वडे अधिक पौष्टीक होतील.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स