मेथीचे सेवन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पण बहुतांश लोकं मेथी खाणे टाळतात. मेथीची भाजी चवीला खूप कडू लागते. त्यामुळे मेथी खाताना अनेक जण नाकं मुरडतात. मेथीचे अनेक प्रकार केले जातात. मेथीची भाजी, मेथीचे पराठे, मेथी मलाई, हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण आपण कधी मेथीची वडी ही रेसिपी ट्राय केली आहे का?
जे लोकं मेथीची भाजी खात नाही, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. मेथीची वडी कमी साहित्यात - कमी वेळात तयार होते. मेथीची वडी बेसन व मसाल्यांचा वापर करून तयार होते. जी चवीला बाहेरून क्रिस्पी व आतून सॉफ्ट लागते. चला तर मग या पौष्टीक - टेस्टी पदार्थाची झटपट कृती पाहूयात(How to make Methi (Fenugreek) vadi. Indian Snack).
मेथीची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य
चार कप मेथी
एक कप बेसन
अर्धा कप तांदळाचं पीठ
बारीक चिरलेली हिरवी मिरची
पोह्यांचा टेस्टी डाएट चिवडा आता करा घरीच, ५ मिनिटात खमंग चिवडा तयार
जिरं
लसणाच्या पाकळ्या
पांढरे तीळ
हळद
तेल
मीठ
कृती
सर्वप्रथम, मेथी चांगली धुवून चिरून घ्या, व ही चिरलेली मेथी एका बाऊलमध्ये काढून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची व जिरं घालून मिश्रण वाटून घ्या. व वाटलेलं हे मिश्रण मेथीमध्ये मिक्स करा. आता त्यात बेसन, तांदळाचं पीठ, पांढरे तीळ, हळद, चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून तेल घालून साहित्य एकजीव करा. मिश्रण मिक्स करत असताना थोडं पाणी घाला. व हे पीठ सॉफ्ट - घट्ट तयार करा.
हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार
आता एक मोठी प्लेट घ्या, त्याला तेलाने ग्रीस करा. त्यात मेथीचे तयार पीठ हाताने पसरवा. व त्यावरून पांढरे तीळ देखील पसरवा. याला स्टीमरमध्ये १० ते १५ मिनिटांसाठी स्टीम करून घ्या. स्टीम करून झाल्यानंतर थंड करण्यासाठी बाहेर काढून ठेवा. व वडीचे चौकोनी आकारामध्ये काप करा. दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. व त्यात हे वडी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे मेथीची वडी खाण्यासाठी रेडी.