मेथीची भाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. मेथीची भाजी ही पालेभाज्यांमधील सर्वात पौष्टिक पालेभाजी मानली जाते. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून किमान एक दिवस तरी मेथीची भाजी ही आवर्जून केलीच जाते. मेथी या पालेभाजीचे अनेक पदार्थ आपण घरच्या घरी तयार करून खातो. मेथीच्या भाजी शिवाय मेथीचा पराठा, बेसन पेरून केलेली मेथीची भाजी, डाळ मेथी अशा विविध प्रकारे आपण मेथीच्या भाजीचा आपल्या आहारात समावेश करून घेतो.
काहीशी कडवट चव असली तरी मेथीची (Methi) परतून किंवा पातळ भाजी खायला चविष्ट लागते. कडू असले तरी कारले ज्याप्रमाणे औषध म्हणून खायला हवे, त्याचप्रमाणे मेथीही कडू असली तरी खायला हवी हे नक्की. सध्या पावसाळ्यात बाजारात सगळ्या भाज्या अतिशय मस्त, फ्रेश मिळतात. अशावेळी भरपूर मेथी आणली जाते. मग कधी परतून भाजी, कधी पातळ भाजी, कधी मेथीची कढी तर कधी पकोडे. मेथीचे पराठे आणि पुऱ्या तर नेहमीच्याच. काही जण मेथी अगदी आवडीने खातात तर काही जण औषध म्हणून, पण मेथी कडू लागते म्हणून नाक मुरडणारेही बरेच जण असतात. पण आरोग्यासाठी फायदेशीर असलेली ही मेथी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खायला हवी. मेथीचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर यंदाच्या पावसाळ्यात मेथीची जुडी घरी आणल्यावर खुसखुशीत, खमंग मेथीची वडी नक्की ट्राय करून पहा(How to make Methi (Fenugreek) vadi. Indian Snack).
साहित्य :-
१. पिवळी मूग डाळ - १/४ कप (२० मिनिटे पाण्यांत भिजवलेली)२. मेथीची पाने - १ जुडी मेथीची पाने३. बेसन - ३ कप ४. तांदुळाचे पीठ - १ कप५. हळद - १ टेबलस्पून ६. लाल तिखट मसाला - २ टेबलस्पून ७. धणे पूड - ३ टेबलस्पून ८. गरम मसाला - १ टेबलस्पून ९. मीठ - चवीनुसार १०. पाणी - गरजेनुसार ११. तेल - २ ते ३ टेबलस्पून
गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!
फक्त १० मिनिटांत घरीच करा हलका-जाळीदार ढोकळा, मिश्रण न फेटता, न आंबवता करा ढोकळा...
कृती :-
१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये पिवळी मुगाची डाळ घेऊन ती पाण्यांत २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा. २. मेथीची एक जुडी घेऊन त्याचे पाने निवडून घ्यावीत. ही पाने बारीक चिरून घ्यावीत. ३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये मेथीची बारीक चिरलेली पाने, भिजवून घेतलेली मूग डाळ, बेसन, तांदुळाचे पीठ, हळद, मीठ, लाल तिखट मसाला, धणे पूड, गरम मसाला घालून मग गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. ४. पाणी घालून त्याचे मध्यम कन्सिस्टंन्सीचे पीठ तयार करून घ्यावे.
दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची झटपट पेस्ट बनवण्याची सोपी कृती, पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत...
विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...
५. आता एका मोठ्या काठ असणाऱ्या डिशला तेल लावून त्यात हे मेथी वडीचे मिश्रण ओतून घ्यावे. ६. त्यानंतर कुकरच्या भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात ही डिश ठेवून १५ ते २० मिनिटे मेथीची वडी वाफवून घ्यावी. ७. मेथी वडीचे मिश्रण वाफवून घेतल्यानंतर थोडे थंड झाल्यावर त्याच्या सुरीने छोट्या छोट्या वड्या पाडून घ्याव्यात. ८. एका पॅनमध्ये तेल घेऊन वड्या शॅलो फ्राय करून घ्याव्यात. आपण आपल्या आवडीनुसार वड्या तेलात तळून डिप फ्राय देखील करु शकता.
कोथिंबीर-पुदिन्याची जुडी निवडली पण दोन दिवसात सडली तर ? ३ उपाय, पुदिना - कोथिंबीर राहील हिरवीगार...
गरमागरम, खुसखुशीत, खमंग मेथीच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. या वड्या हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.