Lokmat Sakhi >Food > कुरकुरीत कोथिंबीर-मेथी वडी, करुन फ्रिजमध्ये स्टोअर करा- हव्या तेव्हा तळून खा! जास्त दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर मेथी वडीची रेसिपी...

कुरकुरीत कोथिंबीर-मेथी वडी, करुन फ्रिजमध्ये स्टोअर करा- हव्या तेव्हा तळून खा! जास्त दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर मेथी वडीची रेसिपी...

How To Make Methi - Kothimbir Vadi At Home : Homemade Traditional Recipe : मेथी व कोथिंबीर बाजारांत स्वस्त मिळाली की आपण जास्तीची मेथी व कोथिंबीर खरेदी करुन त्याच्या वड्या बनवून ठेवतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 01:39 PM2023-03-28T13:39:30+5:302023-03-28T13:54:33+5:30

How To Make Methi - Kothimbir Vadi At Home : Homemade Traditional Recipe : मेथी व कोथिंबीर बाजारांत स्वस्त मिळाली की आपण जास्तीची मेथी व कोथिंबीर खरेदी करुन त्याच्या वड्या बनवून ठेवतो.

How To Make Methi - Kothimbir Vadi At Home | कुरकुरीत कोथिंबीर-मेथी वडी, करुन फ्रिजमध्ये स्टोअर करा- हव्या तेव्हा तळून खा! जास्त दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर मेथी वडीची रेसिपी...

कुरकुरीत कोथिंबीर-मेथी वडी, करुन फ्रिजमध्ये स्टोअर करा- हव्या तेव्हा तळून खा! जास्त दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर मेथी वडीची रेसिपी...

'वडी' हा प्रकार महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळीमधील सर्वात महत्वाचा प्रकार आहे. ताटात कोणती ना कोणती 'वडी' असल्याशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होतंच नाही. अळू वडी, कोथिंबीर वडी, सुरळीची वडी, सांबर वडी, कोबीच्या वड्या, पालक वडी असे वड्यांचे अनेक प्रकार आपल्याला महाराष्ट्रांत पहायला मिळतात. मेथी -कोथिंबीर वडी हा असाच एक मस्त कुरकुरीत पदार्थ.

ताज्या तर या वड्या चांगल्या लागतातच, पण करुन आपण फ्रिजमध्ये ठेवल्यास त्या जास्तकाळ टिकतातही. आपल्याला हव्या तेव्हा बाहेर काढून ठेवायच्या आणि कुरकुरीत तळायच्या. या वड्या खमंग, कुरकुरीत तळून घेतल्या तर जेवणाची लज्जत तर वाढतेच व जेवणाचे चार घास अधिकच जातात. आपल्याला काहीवेळा मेथी व कोथिंबीर बाजारांत स्वस्त मिळाली की आपण जास्तीची मेथी व कोथिंबीर खरेदी करुन त्याच्या वड्या करुन ठेवू शकतो(How To Make Methi - Kothimbir Vadi At Home).

साहित्य :- 

१. मेथी - १ कप
२. कोथिंबीर - १ कप
३. आलं - लसूण पेस्ट - १/२ टेबलस्पून
४. हिंग - १/२ टेबलस्पून
५. लाल तिखट मसाला - २ टेबलस्पून
६. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
७. हळद - १ टेबलस्पून
८. गरम मसाला - १ टेबलस्पून
९. चिंच पेस्ट - १/२ टेबलस्पून
१०. बेसन - १ कप
११. तांदूळ पीठ - १/४ कप
१२. मीठ - चवीनुसार
१३. पाणी - १/२ कप
१४. तेल - ४ ते ५ टेबलस्पून (तळण्यासाठी)


सुरणाचे खमंग चटपटीत काप करण्याची पारंपरिक कृती; गरमागरम वरणभात आणि सुरण काप-बेत जमणारच..

कृती :- 

१. सर्वप्रथम मेथी आणि कोथिंबिरीची पाने निवडून घ्यावीत. आता मेथी व कोथिंबीर एकत्रित करुन ते बारीक चिरुन घ्यावेत. 
२. आता बारीक चिरुन घेतलेली मेथी व कोथिंबीर एका डिशमध्ये काढून घ्यावी त्यानंतर त्यात आलं - लसूण पेस्ट, हिंग, लाल तिखट मसाला, जिरेपूड, हळद, गरम मसाला, चिंच पेस्ट, बेसन, तांदूळ पीठ व चवीनुसार मीठ घालून घ्यावे.   


३. आता हे सगळे जिन्नस हातांनी एकत्रित कालवून घ्यावे. आता या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून कणकेसारखे पीठ मळून घ्यावे. 


४. हे घट्टसर कणकेसारखे मळून झाल्यानंतर बाजूला ठेवून द्यावे. 
५. आता एका चाळणीला तेल लावून या तयार पिठाच्या लांबसर पट्ट्या तयार करुन त्या तेल लावलेला चाळणीत ठेवून द्याव्यात आता ही चाळणी आपण कुकरमध्ये ठेवून वाफेवर शिजवून घेऊ शकतो. तसेच एक मोठा टोप घेऊन त्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरुन त्यावर ही चाळण ठेवून वरुन झाकण ठेवावे. अशा दोन्ही प्रकारांपैकी एका पद्धतींचा वापर करुन या वड्या वाफेवर २० मिनिटे शिजवून घ्याव्यात. 

६. वड्या संपूर्णपणे वाफेवर शिजल्यानंतर थोड्या गार झाल्यावर त्या पिठाच्या रोलच्या छोट्या - छोट्या वड्या पाडाव्यात.
७. आता एका कढईमध्ये तेल घेऊन ते व्यवस्थित तापवून घ्यावे. या गरम तेलात वड्या खरपूस, सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. 

कुरकुरीत, खमंग मेथी-कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे. आपण ही मेथी-कोथिंबीर वडी हिरव्या चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करु शकता.

Web Title: How To Make Methi - Kothimbir Vadi At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.