'मेथी'ची भाजी ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथीची भाजी खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक ठरते. मेथीमध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते आणि त्यातील बायोएक्टिव्ह घटकांमुळे मेथीच्या भाजीमध्ये औषधी गुणधर्म असतात. एरव्ही आपण मेथीचा वापर करून मेथीची भाजी, मेथीचा पराठा, मेथीचे मुटके असे अनेक पदार्थ खातोच. परंतु याच मेथीचा वापर करून आपण त्यापासून अनेक स्नॅक्सचे पदार्थ झटपट बनवू शकतो(How To Make Methi Puri At Home).
दिवाळी (Diwali 2023) सण जवळ आला आहे. सगळ्यांच्या घरी फराळ करण्याची लगबग सध्या सुरूच असेल. फराळ म्हटलं की त्यात गोड, तिखट, मसालेदार, खारट असे सगळ्या प्रकारचे पदार्थ येतात. दिवाळीच्या फराळात आपण लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळे, पुऱ्या (Crispy Methi Poori) असे अनेक प्रकार बनावतो. खास दिवाळीच्या फराळासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या घरी बनवल्या जातात. यात साधी पुरी, तिखट मिठाची खारी पुरी, जिरा पुरी असे असंख्य प्रकार असतात. यंदाच्या दिवाळीत आपण फराळासाठी काहीतरी नवीन ट्राय करायचे म्हणून मेथीच्या खस्ता खाऱ्या - पुऱ्या अगदी झटपट बनवू शकतो. मेथीच्या खाऱ्या - पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य व कृती पाहूयात(Methi Puri Recipe).
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - २ ते ३ कप
२. रवा - १ कप
३. मेथी - १ कप (बारीक चिरलेली)
४. जिरे - १ टेबलस्पून
५. हळद पावडर - १ टेबलस्पून
६. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
७. तीळ - १ टेबलस्पून
८. मीठ - १ टेबलस्पून
९. तेल - २ ते ३ टेबलस्पून
१०. पाणी - गरजेनुसार
कोण म्हणतं बुंदीचा लाडू घरी करणं जमतच नाही ? ही घ्या सोपी रेसिपी - करा बुंदीचे लाडू आता घरी...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, बारीक चिरलेली मेथी, जिरे, हळद पावडर, लाल मिरची पावडर, तीळ असे सगळे जिन्नस घालून घ्यावे.
२. त्यानंतर या तयार पिठाच्या मिश्रणात तेल, चवीनुसार मीठ, पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे.
३. पीठ मळून घेतल्यानंतर त्यावर थोडेसे तेल घालून हे पीठ १० ते १५ मिनिटे मुरण्यासाठी झाकून तसेच ठेवावे.
फराळाची राणी नाजूक चंपाकळी ! पारंपरिक सुंदर गोड पदार्थ दिवाळीत करा नक्की, पाहा रेसिपी...
आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...
४. आता या तयार पिठाचे गोल गोळे करुन घ्यावेत. या गोळ्याची मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यावी.
५. या गोल चपातीचे सुरीने चार भागात तुकडे करुन घ्यावेत.
६. तुकडे करून घेतलेल्या या प्रत्येक भागांवर सुरीने लहान लहान टोचे मारुन घ्यावेत.
७. गरम तेलात या पुऱ्या एक एक करुन सोडाव्यात व दोन्ही बाजुंनी खरपूस तळून घ्याव्यात.
अशाप्रकारे आपल्या मेथीच्या खाऱ्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत.