आपल्याकडे भाकरी म्हटलं की त्यासोबत गरमागरम पिठलं, झुणका हे आलंच. छान टम्म फुगलेल्या भाकरीसोबत झुणका, पिठलं, फोडलेला कांदा, मिरचीचा ठेचा यांची सर कशालाही येणार नाही. जर आपल्यासमोर असणाऱ्या ताटात गरमागरम झुणका व भाकरी दिली तर एका ऐवजी दोन भाकऱ्या आपण कधी फस्त करु हे आपल्यालाच समजणार नाही. झुणका हा प्रकार महाराष्ट्राच्या पारंपरिक (Maharasthrian recipe) पदार्थांपैकी एक आहे. महाराष्ट्रातल्या विविध राज्यांत वेगवेगळ्या चवीचा झुणका तयार केला जातो. घरात भाजी उपलब्ध नसेल तर, आपण फक्त बेसनाचा साधा झुणका (Dry Methi Besan) तयार करू शकतो. ही रेसिपी कमी साहित्यात कमी वेळात तयार होते व चवीलाही भन्नाट लागते(Methi Jhunka recipe).
काहीवेळा आपल्या घरात पालेभाज्या या फारशा आवडीने खाल्ल्या जात नाहीत. अशावेळी या उरलेल्या पालेभाज्यांच नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो. अशावेळी आपण या पालेभाज्यांचे इतर पदार्थ बनवून खातो. बरेचदा आपल्या घरात मेथीचे पराठे, मेथीची भाजी बनवून थोडीशी मेथी शिल्लक असते. तेव्हा आपण या उरलेल्या मेथीचा वापर करून झटपट तयार होणारा खमंग, मसालेदार मेथीचा झुणका (How to Make Methi Zunka) बनवू शकतो. मेथीची भाजी म्हटली की आपण ती परतून करतो किंवा मेथीचे पराठे करतो. पण ग्रामीण भागात आवर्जून केला जाणारा मेथीचा झुणका अतिशय चविष्ट लागतो. मेथीचा झुणका (Maharashtrian methi zunka) बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How to make Methi Zunka).
साहित्य :-
१. तेल - २ ते ३ टेबलस्पून २. मोहरी - १ टेबलस्पून ३. जिरे - १ टेबलस्पून४. हिंग - चिमूटभर ५. हिरवी मिरची व लसूण बारीक पेस्ट - १ टेबलस्पून ६. हळद - १ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार ७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ८. धणेपूड - १ टेबलस्पून ९. मेथीची पाने - १ कप (बारीक चिरुन घेतलेली)१०. बेसन - १ ते २ टेबलस्पून ११. कडीपत्ता - ६ ते ७ पाने १२. पाणी - १ ते २ कप
मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी...
दह्याची कढी तर नेहमीच खातो, एकदा चाखून पहा 'दही तडका '... गरमागरम पोळी व भातासोबत लागेल चविष्ट
कृती :-
१. सर्वात आधी एका कढईमध्ये तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करुन घ्यावे. २. आता या गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग, हिरवी मिरची व लसूण बारीक पेस्ट, कडीपत्ता, हळद, लाल तिखट मसाला, धणेपूड घालून घ्यावे. ३. हे सगळे जिन्नस तेलात चांगले भाजून त्याची खमंग फोडणी तयार करुन घ्यावी.
थालीपीठाची भाजणी संपली ? भाजणी शिवाय बनवा अगदी १० मिनिटांत कारवार स्पेशल रवा थालीपीठ....
अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...
४. आता यात मेथीची बारीक चिरुन घेतलेली पाने घालूंन ती भाजी थोडी शिजू द्यावी, भाजी शिजत आली की त्यात पाणी घालावे. ५. त्यानंतर यात गरजेनुसार बेसन घालावे. ६. बेसन घातल्यावर चमच्याने सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. ७. आता या झुणक्यातील पाण्याचा अंश संपूर्ण सुकेपर्यंत मंद आचेवर झुणका कोरडा होईपर्यंत शिजवून घ्यावा.
आपला झटपट तयार होणारा मेथीचा कोरडा झुणका खाण्यासाठी तयार आहे. हा झुणका गरमागरम भाकरी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा. अशाच प्रकारे आपण मेथी ऐवजी कोथिंबिरीचा वापर करून देखील झुणका बनवू शकतो.