Lokmat Sakhi >Food > कृष्णजन्माष्टमीसाठी मिल्क पावडरपासून करा चवदार पेढा फक्त १५ मिनिटांत, चव अशी भारी की विसराल विकतचे पेढे 

कृष्णजन्माष्टमीसाठी मिल्क पावडरपासून करा चवदार पेढा फक्त १५ मिनिटांत, चव अशी भारी की विसराल विकतचे पेढे 

Food And Recipe: सणासुदीचे दिवस आले की पेढ्यांमध्ये होणाऱ्या भेसळीच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. म्हणूनच तर आता घरच्याघरी पेढा करण्याची ही एक सोपी रेसिपी जाणून घ्या..(how to make burfi or mithai at home?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 05:49 PM2022-08-18T17:49:48+5:302022-08-18T17:51:22+5:30

Food And Recipe: सणासुदीचे दिवस आले की पेढ्यांमध्ये होणाऱ्या भेसळीच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. म्हणूनच तर आता घरच्याघरी पेढा करण्याची ही एक सोपी रेसिपी जाणून घ्या..(how to make burfi or mithai at home?)

How to make milk powder burfi at home? Recipe of milk mithai just in 15 minutes | कृष्णजन्माष्टमीसाठी मिल्क पावडरपासून करा चवदार पेढा फक्त १५ मिनिटांत, चव अशी भारी की विसराल विकतचे पेढे 

कृष्णजन्माष्टमीसाठी मिल्क पावडरपासून करा चवदार पेढा फक्त १५ मिनिटांत, चव अशी भारी की विसराल विकतचे पेढे 

Highlights घरच्याघरी पेढे तयार करण्याची ही सोपी रेसिपीअवघ्या १५ मिनिटांत उत्कृष्ट चवीचा पेढा तयार

श्रावण महिना सुरू झाला की घरात पूजा- पाठ, धार्मिक कार्यक्रम सुरू होतात. सणासुदीचे दिवसही आता पुढेच आहेत. त्यामुळे घरी एखादा धार्मिक कार्यक्रम असो किंवा मग एखादा सण. घरात गोड म्हणून पेढे (pethe, mithai or burfi) हमखास आणलेच जातात. म्हणूनच पेढ्यांची मागणी वाढल्याने त्यात भेसळ होण्याचं प्रमाणही वाढतं. त्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. म्हणूनच तर घरच्याघरी पेढे तयार करण्याची ही सोपी रेसिपी (how to make burfi at home?) एकदा बघून घ्या. अवघ्या १५ मिनिटांत उत्कृष्ट चवीचा पेढा तयार होतो. (quick and simple recipe of making burfi)

 

घरच्याघरी तयार करा पेढा
साहित्य

एक वाटी मिल्क पावडर, पाव वाटी तूप, अर्धी वाटी दूध आणि पाव वाटी साखर, १ टेबलस्पून वेलची पूड
कृती
- पेढा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक कढई गॅसवर तापायला ठेवा. 
- कढई तापली की त्यात तूप टाका. तूप गरम झालं की त्यात मिल्क पावडर टाका.

जन्माष्टमीच्या प्रसादासाठी करा दोन प्रकारच्या पारंपरिक पंजिरी, कृष्णाला आवडणारा खास पदार्थ!
- तूप खूप जास्त कडक करू नये, तसेच गॅस खूप मोठा किंवा मध्यमही ठेवू नये. ही रेसिपी करताना गॅस मंद ठेवावा. कारण मिल्क पावडर लगेचच करपून जाते.
- अगदी मंच आचेवर मिल्क पावडर परतून घ्या. तिचा रंग हलकासा तपकिरी म्हणजेच गोल्डन ब्राऊन झाला की त्यात दूध टाका. एकदम थंड दूध टाकू नका. सामान्य तापमानावरचं किंवा मग कोमट केलेलं दूध टाका.


- मिल्क पावडर अगदी पांढरट दिसत असतानाच दूध टाकू नका. तिचा रंग बदलू द्या, नाहीतर पेढे चवदार होणार नाहीत.

पावसाळ्यात केस जास्तच गळू लागलेत? तज्ज्ञ सांगतात ३ पदार्थ, केसांच्या मजबुतीसाठी नियमित खा आणि वापरा 
- दूध टाकल्यावर मिल्क पावडर आणि दूध हे मिश्रण एकत्र होऊन आटून येईल. ते आटून थोडं घट्ट झालं की मग त्यात साखर टाका. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी- जास्त करू शकता.
- साखर टाकल्यावर मिश्रण पुन्हा थोडं पातळ होईल, पण हळू हळू घट्ट होत जाईल. घट्ट झालं की गॅस बंद करावा. मिश्रण थंड झालं की त्याचे आवडीनुसार आकार करून पेढे करावेत. 

 

 

Web Title: How to make milk powder burfi at home? Recipe of milk mithai just in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.