लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच केक फार प्रिय आहे. केक हा कोणत्याही प्रकारचा असो तो खायला सगळ्यांनाच आवडते. त्यातही चॉकलेट फ्लेवरचा केक असेल तर अजून काय हवं... बरेच घरातील लहान मुलं केक खायचा म्हणून हट्ट धरून बसतात. अशावेळी आपण त्यांना बाहेरून केक विकत आणून देतो. परंतु दररोज असे बाहेरचे काहीतरी विकत आणून खायला देणे हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. एवढेच नाहीतर मुलं संध्याकाळच्या भुकेच्या वेळी काहीतरी वेगळं खायला हवं म्हणून आरडा - ओरडा करतात. अशावेळी रोज नवीन काय बनवावं हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न असतो.
प्रत्येकवेळी मुलं हट्ट करतात म्हणून त्यांना विकतचा केक खायला देणं योग्य नाही. अशावेळी आपण घरच्या अप्पे पात्राचा वापर करुन झटपट होणारे मिनी चोको लाव्हा केक (Choco Lava Cake) बनवू शकतो. हाच चोको लाव्हा केक(Choco Lava Cake) जर आपण बाहेरून विकत आणायचा म्हटलं तर खूप महाग मिळतो. त्यापेक्षा आपण घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट ही रेसिपी बनवू शकतो. चॉकलेट फ्लेव्हर केकच्या पोटातील वितळलेले ते चॉकलेट खाणे यांसारखी दुसरी मजा नाही. यासाठीच घरच्या घरी अप्पे पात्रात झटपट तयार होणारे व मुलांच्या आवडीचे चोको लाव्हा केक (Choco Lava Cake) बनवणे आता झाले सोपे(How to make mini chocolate cake in appe pan at home).
साहित्य :-
१. चॉकलेट फ्लेवर्ड क्रिमची बिस्किटे - १ पाकीट
२. दूध - २०० मि.ली
३. बेकिंग सोडा - चिमुटभर
४. चॉकलेट - १ पाकीट
५. बटर - २ ते ३ टेबलस्पून
चुरा झालेल्या पापडाचे करायचे काय, झटपट बनवा पापड चाट... रोजच्या जेवणाची वाढेल लज्जत...
कृती :-
१. सर्वप्रथम, चॉकलेट फ्लेवर्ड क्रिमची बिस्किटे घेऊन ती मिक्सरमध्ये लावून बारीक वाटून त्याचा बारीक पावडरसारखा चुरा करून घ्यावा.
२. आता हा बिस्किटाचा केलेला चुरा मिक्सरच्या भांड्यातून काढून एका बाऊलमध्ये ओतून घ्यावा.
३. या बिस्किटाच्या चुऱ्यामध्ये दूध मिसळा. दूध मिसळून त्याची मध्यम कंन्सिस्टंसीची पेस्ट तयार करुन घ्यावी.
४. या चॉकलेट पेस्टमध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या न ठेवता अगदी स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यावी.
५. त्यानंतर यात अगदी चिमूटभर सोडा घालावा व त्या सोड्यावर चमचाभर दूध घालूंन, सोडा या मिश्रणात विरघळवून घ्यावा.
धो - धो कोसळणाऱ्या पावसात चमचमीत खावंसं वाटतंय? घ्या चणा गार्लिक फ्राय करण्याची चटकदार रेसिपी...
अस्सल गावरान झणझणीत चवीचं मेथी पिठलं खाऊन तर पाहा, पावसाळ्यातला झक्कास बेत!
६. आता अप्पे पात्र घेऊन त्याला थोडेसे बटर लावून ग्रीस करुन घ्यावे.
७. त्यानंतर या अप्पे पात्रात हे चॉकलेटचे तयार केलेले बॅटर घालावे.
८. आता या बॅटरमध्ये बरोबर मधोमध चॉकलेटचा एक तुकडा ठेवावा आणि त्यावर परत हे बॅटर घालावे.
९. त्यानंतर या अप्पे पात्रावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे हे केक शिजवून घ्यावेत.
१०. हे चोको लाव्हा केक दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजवून घ्यावे.
आपले मिनी चोको लाव्हा केक (Choco Lava Cake) खाण्यासाठी तयार आहेत. हे केक खाण्यासाठी सर्व्ह करताना त्यावर आपल्या आवडीनुसार चॉकलेट सिरप घालून खावेत.