Join us  

ना डाळ-तांदूळ, ना चटणी-सांबार; कपभर रव्याची करा मिनी मसाला इडली, इन्स्टंट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2024 1:03 PM

How to Make Mini Masala Idli | Breakfast Recipe : नुसता रव्याचा गोळा लागू नये म्हणून फॉलो करा काही टिप्स, मिनी इडली होतील चविष्ट

साउथ इंडियन पदार्थ म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी इडली, डोसा, मेदूवडे हे पदार्थ येतात. बरेच जण सकाळी ब्रेकफास्टमध्ये आवडीने इडली सांबार खातात. पण इडली तयार करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. डाळ-तांदूळ भिजवण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंत याची प्रोसेस खूप मोठी आहे. पण जर आपल्याला झटपट मसाला मिनी इडली खायची असेल तर, रव्याचा वापर करून इडली करून पाहा (Idli Recipe).

बऱ्याचदा रवा नीट भिजत नाही, किंवा खाताना फक्त रव्याचा गोळाच लागतो. त्यामुळे रव्याची इडली करताना साहित्यांचा वापरही योग्य पद्धतीने करायला हवा. जर आपल्याला चटणी आणि सांबार बनवण्याचा कंटाळा आला असेल तर, मिनी मसाला इडली करून पाहा (Cooking Tips). झटपट नाश्ता काही मिनिटात तयार होईल(How to Make Mini Masala Idli | Breakfast Recipe).

मिनी मसाला इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

दही

मीठ

तेल

पाणी

इनो

घरातला लसूण संपला? ऐनवेळी लसणाऐवजी वापरा ३ गोष्टी, पदार्थ होईल रुचकर

तेल

मोहरी

भाजकी चणा डाळ

कडीपत्ता

कांदा

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप रवा घ्या. त्यात एक कप दही, चवीनुसार मीठ, एक चमचा तेल आणि अर्धा कप पाणी घालून मिक्स करा. रव्याचे गुठळ्या तयार होणार नाही अशा पद्धतीने मिक्स करा. नंतर त्यावर १५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून रवा दह्यात भिजेल.

१५ मिनिटानंतर त्यात एक इनोची पुडी घालून मिक्स करा. इडलीच्या पात्राला ब्रशने थोडे तेल लावा. त्यावर चमचाभर बॅटर ओतून पीठ भरा. इडली स्टीमरमध्ये पात्र ठेवून झाकण लावा. १० ते १५ मिनिटांसाठी इडली वाफवून घ्या. १० मिनिटानंतर इडली पात्र बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवा. नंतर चमच्याने हलक्या हाताने इडली बाहेर काढा.

मटकीला मोड नाही आणि या टिपला तोड नाही, एका दिवसात कडधान्यांना येईल लांबसडक मोड-पाहा ट्रिक

एका कढईत २ चमचे तेल घाला. त्यात २ चमचे मोहरी, एक चमचा भाजकी चणा डाळ, कडीपत्त्याची पानं, एक बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर आपण त्यात आपल्या आवडीचे मसाले घालू शकता. नंतर त्यात मिनी इडली घालून मिक्स करा. अशा प्रकारे मिनी मसाला इडली खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स