Lokmat Sakhi >Food > मोदकाचे सारण सैल किंवा कडक झाले तर? पाहा सारणाची परफेक्ट कृती- मोदक फसणारच नाहीत...

मोदकाचे सारण सैल किंवा कडक झाले तर? पाहा सारणाची परफेक्ट कृती- मोदक फसणारच नाहीत...

Modak Saran : How To Make Modak Saran : How To Make Modak Stuffing : मोदकाच सारण खूपच कडक किंवा सैलसर होत असेल तर ही घ्या सारण करण्याची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2024 04:19 PM2024-09-06T16:19:05+5:302024-09-06T16:28:57+5:30

Modak Saran : How To Make Modak Saran : How To Make Modak Stuffing : मोदकाच सारण खूपच कडक किंवा सैलसर होत असेल तर ही घ्या सारण करण्याची सोपी रेसिपी...

How To Make Modak Stuffing How To Make Modak Saran Modak Saran | मोदकाचे सारण सैल किंवा कडक झाले तर? पाहा सारणाची परफेक्ट कृती- मोदक फसणारच नाहीत...

मोदकाचे सारण सैल किंवा कडक झाले तर? पाहा सारणाची परफेक्ट कृती- मोदक फसणारच नाहीत...

सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आता काही तासातच आगमन होणार आहे. गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. मोदक हा गोड पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा आहे. बाप्पाच्या नैवेद्याला आणि प्रसादासाठी शक्यतो आपण मोदकच तयार करतो. मोदक उकडीचे असो किंवा तळणीचे जेव्हा मोदकाचे सारण चवीला छान होते तेव्हा मोदक खायला आणखीनच चांगले लागतात. मोदकाचे सारणच मोदकाची अस्सल चव वाढवण्यास मदत करते. जर हे सारण खूप चिकट, कडक किंवा कमी गोड असेल तर असे मोदक चवीला चांगले लागत नाही(How To Make Modak Stuffing).

अगदी परफेक्ट मोदक तयार करणे ही एक प्रकारची कलाच आहे. त्यामुळे मोदक करणे हे इतके सोपे काम नाही. सगळ्यांनाच मोदक तयार करता येतात असे नाही. मोदक तयार करताना त्याचे सारण आणि उकड या दोन गोष्टी अगदी परफेक्ट जमल्या तरच मोदक मस्त होतात. मोदकाचे सारण तयार करताना अनेकदा गृहिणींना अनेक अडचणी येतात. कधी सारण कडक होते तर कधी खूपच पातळ सैलसर होते. सारण बिघडले तर मोदकही खायला फारसे चांगले लागत नाहीत. यामुळे सारण न चुकता अगदी परफेक्ट तयार व्हावे यासाठी त्याची पारंपरिक रेसिपी आणि काही सोप्या टिप्स पाहूयात(How To Make Modak Saran).

साहित्य :- 

१. ओलं खोबरं - २ कप (नारळ खवून घेतलेला)
२. गूळ - २ कप 
३. ड्रायफ्रुटस काप - १/२ कप (आवडीनुसार) 
४. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
५. केसर - ६ ते ८ काड्या
६. तूप - १ टेबलस्पून 
७. खसखस - १/२ टेबलस्पून 

तब्बल महिनाभर टिकतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक, पौष्टिकही आणि प्रसादासाठीही उत्तम-सोपी रेसिपी...


वाटी- चमच्याने द्या मोदकाला  परफेक्ट आकार! नाजूक - सुबक होतील मोदक - पाहा भन्नाट आयडिया...

कृती :- 

१. एक मोठी डिश घेऊन त्यात किसलेलं ओलं खोबरं आणि किसलेला गूळ एकत्रित करून व्यवस्थित चमच्याने ढवळून मिक्स करुन ठेवावे. 
२. त्यानंतर मंद आचेवर सारण शिजवून घ्यावे. 
३. सारण अर्धे शिजत आले की त्यात कढईच्या कडेने तूप घालावे. 
४. आता या सारणात आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटसचे काप व केसर, खसखस घालावे.  
५. कढईतील सारण शिजून कढईच्या कडा सोडून लागले की सारण तयार झाले असे समजावे. 

गणेशोत्सव स्पेशल : तळणीच्या मोदकाचं आवरण मऊ पडतं, चिवट होतं? फक्त ५ टिप्स-मोदक होतील खुसखुशीत...

सारण तयार करताना लक्षात ठेवा :- 

१. खोबरं गुळाचं सारण तयार करताना जितके खोबऱ्याचे प्रमाण असेल तितकेच गूळ घ्यावे. गूळ, खोबरं दोन्ही सम प्रमाणात घ्यावे.   
२. सारण तयार करण्यापूर्वी एक तास आधी गूळ, ओलं खोबरं एकत्रित मिक्स करुन ठेवावे. यामुळे सारण चांगले एकजीव होत आणि सारणही पटकन शिजत.  
३. सारण शिजवताना ते नेहमी मंद आचेवरच शिजवून घ्यावे. 
४. सारण शिजत असताना त्यात १ टेबलस्पून तूप घालून घ्यावे यामुळे सारणाला एक प्रकारची चकाकी येते आणि सारण शिजताना खाली लागत नाही. 
५. सारण एकदम कोरड किंवा अगदीच ओलं ठेवू नये. साधारण माध्यम कंन्सिस्टंन्सीचे सारण करावे. 

Web Title: How To Make Modak Stuffing How To Make Modak Saran Modak Saran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.