रोजच्या जेवणात बदल म्हणून आपण बाजरी किंवा ज्वारीची खिचडी आहारात समाविष्ट करू शकतो. तांदळाच्या तुलनेत बाजरीमध्ये अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. ज्वारी, बाजरीची भाकरी काहीजण रोजच्या जेवणात खातात. त्याचप्रमाणे बाजरीची खिचडीसुद्धा चवीला आणि तब्येतीलाही चांगली असते. सध्याच्या मिलेट्स डाएट आणि लो कार्ब डाएटसाठी बाजरीची खिचडी हा एकदम उत्तम पर्याय आहे.
खिचडी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ तर आहेच. मुगाची डाळ- तांदळाची खिचडी तर आपण नेहमी करतोच. कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर आपण पटकन कुकरला खिचडी लावून झटपट जेवण उरकतो. पावसाळा हा असा ऋतू आहे की, आपल्याला नेहमीच काहीतरी गरमागरम आणि पचायला हलके असे पदार्थ खावेसे वाटतात. पावसाळ्यात बाजरी चांगली पचते, शिवाय या दिवसांत बाजरी खाणं, आरोग्याच्या दृष्टीने अधिक पौष्टिकही असतं. म्हणूनच हिवाळ्यात हा एक खमंग पारंपरिक पदार्थ एकदा तरी व्हायलाच हवा. पावसाळ्यात भजी, वडा यांसारखे चटपटीत पदार्थ खाण्यासोबतच बाजरीची पौष्टिक खिचडी देखील एकदा नक्की ट्राय करून पहाच(How To Make Monsoon Special Traditional Authentic Bajra Khichdi).
साहित्य :-
१. तूप - १ ते २ टेबलस्पून
२. जिरे - १ टेबलस्पून
३. कडीपत्ता - ५ ते ६ पाने
४. हिरव्या मिरच्या - ५ ते ६ (बारीक चिरलेल्या)
५. हिंग - १/२ टेबलस्पून
६. कांदा - १ कप (बारीक चिरून घेतलेला)
७. बटाटा - १ कप (बारीक तुकडे करून घेतलेला)
८. गाजर - १ कप (लहान चौकोनी तुकडे केलेले)
९. फरसबी - १ कप (बारीक चिरून घेतलेली)
१०. हळद - १ टेबलस्पून
११. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१२. मीठ - चवीनुसार
१३. बाजरी - १ ते २ कप (८ ते १० तास पाण्यांत भिजवून घेतलेली)
१४. हिरव्या मुगाची डाळ - १/२ कप (८ ते १० तास पाण्यांत भिजवून घेतलेली)
१५. मटार - १ कप
१६. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)
१७. पाणी - गरजेनुसार
तेलाच्या बाटलीची कॅप काढून फेकून देता ? इतके दिवस आपले चुकले 'असे ' वाटेल, पाहा कॅपचा उपयोग...
पावसाळ्यात बिस्किट्स सादळू नयेत म्हणून ६ सोप्या टिप्स, बिस्किटं मऊ पडणार नाहीत...
कृती :-
१. सर्वप्रथम एका कुकरच्या भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात जिरे, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, हिंग घालून घ्यावे.
२. आता या तुपात बारीक चिरलेला कांदा, बटाटा, गाजर, फरसबी घालून हे सर्व जिन्नस तुपात परतून घ्यावेत.
३. त्यानंतर या सगळ्या भाज्या परतून झाल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावे.
४. या भाज्या हलक्याच शिजवून घेतल्यानंतर त्यात ८ ते १० तास पाण्यांत भिजवून घेतलेली बाजरी, हिरव्या मुगाची डाळ, मटार घालावे.
चुरा झालेल्या पापडाचे करायचे काय, झटपट बनवा पापड चाट... रोजच्या जेवणाची वाढेल लज्जत...
आता घरच्या अप्पे पात्रात बनवा झटपट होणारे चोको लाव्हा केक... मुलांची होईल चंगळ !!
५. सर्वात शेवटी हे सगळे जिन्नस चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्यावेत.
६. आता यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी.
७. सगळ्यात शेवटी खिचडी शिजण्यासाठी गरजेनुसार पाणी घालावे व चमचाभर तूप घालून कुकरचे झाकण लावून घ्यावे.
८. खिचडी संपूर्णपणे शिजण्यासाठी ५ ते ६ कुकरच्या शिट्ट्या काढाव्यात.
अस्सल गावरान झणझणीत चवीचं मेथी पिठलं खाऊन तर पाहा, पावसाळ्यातला झक्कास बेत!
पावसाळ्यात गरमागरम खाण्यासाठी बाजरीची पौष्टिक खिचडी तयार आहे. खिचडी सर्व्ह करताना वरून तूप घालूंन खाण्यासाठी सर्व्ह करावे.