आठवडाभर तेच तेच खाऊन कंटाळा आला की विकेंडला काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. बाजारातला ढोकळा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. हा ढोकळा खाल्ल्यानंतर अनेकांना पोट फुगल्यासारखं वाटतं तर कोणाला त्याचा त्रास होत नाही. (How to make Dhokla) पण बाहेरचे पदार्थ अति खाणं तब्येतीसाठी अजिबात योग्य नाही. घरच्याघरी तुम्ही बाजारासारख्या चवीचे पदार्थ बनवू शकता. यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. घरच्याघरी मऊ, खमंग ढोकळा बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Moong dal Dhokla Recipe)
पौष्टीक ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मुगाची डाळ भिजवायला ठेवा. भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटताना त्यात २ ते ३ चिरलेल्या मिरच्या, आलं घाला. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. त्यात १ चमचा हळद, १ चमचा मीठ, १ चमचा साखर आणि १/४ चमचे लिंबाचा रस घाला. हे मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यात इनो घाला.
एका कढईत पाणी उकळण्यासाठी ठेवा हे पाणी उकळल्यानंतर वाटीला तेल लावून त्यात ढोकळ्याचं पीठ घाला आणि वाफेवर शिजवण्यासाठी कढईत घाला. ५ ते १० मिनिटांसाठी कव्हर करून ठेवा. तयार आहे गरमागरम ढोकळा. एका दुसऱ्या भांड्यात तेल तापवून त्यात मोहोरी, पांढरे तीळ, कढीपत्ता, मिरची घालून फोडणी तयार करा. ही फोडणी ढोकळ्यांवर घालून गरमागरम ढोकळे सर्व्ह करा. खोबऱ्याची चटणी किंवा पुदीन्याच्या चटणीबरोबर तुम्ही हे ढोकळे खाऊ शकता.
वर्षभर टिकणारी आंबा पोळी करण्याची परफेक्ट पद्धत; अजिबात दातांना चिकटणार नाही
ढोकळ्याचे पीठ पातळ आणि जाड असल्यास ढोकळा चांगला फुगत नाही आणि स्पॉन्जी होत नाही. खाण्याचा सोडा घातल्यानंतर, द्रावण खूप फेटल्यास सोडाच्या प्रतिक्रियेने तयार होणारा वायू बाहेर येतो, आणि ढोकळा स्पॉन्जी होत नाही. ढोकळ्याच्या पीठात तुम्ही लिंबू पावडरही घालू शकता.