कांदा घालून केलेलं कांद्याचं खमंग थालीपीठ आणि त्यासोबत घट्ट दही, हा तर अनेकांचा आवडीचा पदार्थ. आता असंच खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ मुगाच्या डाळीचंही करता येतं. कांद्याचं थालीपीठ किंवा मुगाच्या डाळीचा डोसा किंवा वरण हे तर झाले नेहमीचे पदार्थ. आता या पदार्थांना थोडं ट्विस्ट करूया आणि मुगाच्या डाळीचं चविष्ट, पौष्टिक थालीपीठ (How to make moong dal paratha) कसं करायचं ते पाहूया. मुगाच्या डाळीचं थालीपीठ (mugachya daliche thalipith) करण्याची रेसिपी अगदी सोपी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, रात्री हलकं- फुलकं काही खायचं असेल किंवा मुलांना डब्यात काही वेगळं पण पौष्टिक द्यायचं असेल, तर हा पदार्थ अगदी उत्तम आहे. (healthy breakfast recipe)
मुगाच्या डाळीचं थालीपीठ करण्याची रेसिपी
साहित्य
अर्धा कप मुगाची डाळ
१ टेबलस्पून आलं- लसूण- मिरची पेस्ट
१ कप गव्हाचं पीठ
१ कप ज्वारीचं पीठ
बाळ अंगावर पीत असतानाही PCOD चा त्रास होतो का? लक्षणं काय नेमकी? तज्ज्ञ सांगतात.....
अर्धा टेबलस्पून तीळ
पाव टीस्पून ओवा
पाव टीस्पून धने- जीरे पूड
पाव कप बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर
रोज करा फक्त ३ व्यायाम, पोट-कंबर आणि मांड्यांवरची चरबी होईल भराभर कमी- बेढब शरीर दिसेल सुडौल
चवीनुसार मीठ
१ टेबलस्पून तेल
रेसिपी
१. मुगाच्या डाळीचं थालीपीठ करण्यासाठी सगळ्यात आधी मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घाला.
२. डाळ २ ते ३ तास चांगली भिजली की मग ती पाण्यातून बाहेर काढा आणि मिक्सरमध्ये टाकून जाडीभरडी वाटून घ्या. डाळीची अगदी बारीक पेस्ट करू नका. त्यात थोडे दाणे दिसलेच पाहिजेत.
श्रावणात शंकराला वाहतो तो बेल बहूगुणी, केस आणि त्वचेच्या तक्रारीही होतील दूर- बेल पानांचा औषधी उपाय
३. वाटून घेतलेली मुग डाळ, कणिक, ज्वारीचं पीठ आणि वरील सगळं साहित्य एका भांड्यात घ्या आणि पीठ व्यवस्थित मळून घ्या.
४. कांद्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही घालू शकता. तसेच थोडं लिंबूही पिळू शकता किंवा दही- ताकही घालू शकता.
५. आता पीठ मळून झालं की कांद्याचं थालीपीठ जसं लावतो, तसंच मुगाच्या डाळीचं थालीपीठही लावा. खमंग- खुसखुशीत थालीपीठ तयार..