कुरकुरीत चिवडा, बारीक शेव, उकडलेली मटकी, थोडा कांदा आणि आवडीनुसार मिरचीचा ठेचा, खारे शेंगदाणे... हे सारे पदार्थ मस्त मिक्स केल्यानंतर त्यावर आंबट - चिंबट लिंबू मारून, वर तळलेली मिरची ठेवून मटकी भेळ एका कागदामध्ये आपल्यासमोर पेश केली जाते. अशी चमचमीत, चटकदार मटकी भेळ (Street Style Matki Bhel Recipe) खायला कोणाला आवडणार नाही. भेळ हा तसा चाट प्रकारांतील सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. बहुतेकवेळा प्रवास करताना हायवेच्या कडेला किंवा रस्त्यांच्या कोपऱ्यात आपण गावरान मटकी भेळचे( Matki Bhel Recipe) ठेले पाहिले असतीलच. धो - धो कोसळणाऱ्या पावसात मस्त चटकदार, चमचमीत मटकी भेळ खाण्याचा आनंद काही औरच असतो.
रोजच्या आहारात मटकीचा आवर्जून समावेश केला जातो. कारण मटकी फक्त भाजी किंवा उसळ करण्यापुरतीच मर्यादित नाही तर ती शरीरासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. मटकीपासून आपण उसळ, रस्सा भाजी, सुकी भाजी तर नेहमीच करतो. परंतु याच मटकीचा वापर करून आपण झटपट घरच्या घरी बाहेर विकत मिळणारी (How To Make Matki Bhel At Home) अस्सल गावरान मटकी भेळ (How to Make Matki Bhel) बनवू शकतो. अशी चटपटीत, चटकदार, मसालेदार पण पौष्टिक अस्सल गावरान मटकी भेळ बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Mouth Watering Chatpati Matki Bhel At Home).
साहित्य :-
१. तेल - १ टेबलस्पून २. मोड आलेली मटकी - २ कप३. हळद - १/४ कप ४. मीठ - १ टेबलस्पून ५. कुरमुरे - २ टेबलस्पून ६. पापडी - १ कप ७. साधी पिवळी शेव - १ कप ८. फरसाण / बुंदी - १ कप ९. खारे दाणे - १ कप १०. लिंबाचा रस - २ ते ३ टेबलस्पून ११. कांदा लसूण मसाला - १ टेबलस्पून १२. बारीक चिरलेला कांदा - १ कप १३. बारीक चिरलेली कांद्याची पात - २ टेबलस्पून १४. बारीक चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून १५. बारीक चिरलेला टोमॅटो - २ टेबलस्पून १६. हिरव्या मिरचीचा ठेचा - १ टेबलस्पून
पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...
नूडल्स करताना चिकट लगदा होतो ? शेफ पंकज भदोरिया सांगतात १ सोपी ट्रिक, नूडल्स होतील मस्त मोकळ्या...
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात सर्वप्रथम तेल घेऊन त्यात हळद घालूंन मोड आलेली मटकी घालावी त्यानंतर चवीनुसार मीठ घालावे. २. वाफेवर मोड आलेली मटकी २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावी. त्यानंतर मटकी थंड होण्यासाठी तशीच डिशमध्ये पसरवून ठेवावी. ३. आता एका मोठ्या भांड्यात कुरमुरे घेऊन त्यात पिवळी बारीक शेव व पापडी घालून घ्यावी.
एक थेंब ही तेल न वापरता फाफडा करता येतो ? पाहा, बिनतेलाची कुरकुरीत फाफडा रेसिपी...
मोड आलेली कच्ची उसळ चिकट होते, आंबूस वास येतो ? १ भन्नाट ट्रिक, उसळ राहील फ्रेश...
४. त्यानंतर आपल्या आवडीनुसार खारे दाणे, फरसाण, बुंदी, कांदा लसूण मसाला, मटकी घालून घ्यावी. ५. आता यात बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कांद्याची पात, हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यावा. ६. सगळ्यांत शेवटी यावरून लिंबाचा रस घालून भेळ चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावी. ७. आता ही तयार भेळ सर्व्ह करताना जे जिन्नस आपण भेळ मध्ये घातले आहेत ते पुन्हा वरून अजून एकदा घालावेत.
उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!
आपली अस्सल गावरान मटकी भेळ खाण्यासाठी तयार आहे.