Lokmat Sakhi >Food > जेवणासाठी फक्त १० मिनिटात करा मुगाची चमचमीत उसळ; सोपी, झटपट रेसेपी

जेवणासाठी फक्त १० मिनिटात करा मुगाची चमचमीत उसळ; सोपी, झटपट रेसेपी

How to Make Mug Usal : फक्त १० मिनिटात कुकरमध्ये मुगाची उसळ कशी करायची ते या लेखात पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:04 PM2022-12-06T15:04:56+5:302022-12-06T17:02:54+5:30

How to Make Mug Usal : फक्त १० मिनिटात कुकरमध्ये मुगाची उसळ कशी करायची ते या लेखात पाहूया.

How to Make Mug Usal : Mugachi usal recipe sprouted moong usal recipe  | जेवणासाठी फक्त १० मिनिटात करा मुगाची चमचमीत उसळ; सोपी, झटपट रेसेपी

जेवणासाठी फक्त १० मिनिटात करा मुगाची चमचमीत उसळ; सोपी, झटपट रेसेपी

रोज रोज त्याच भाज्या  खाऊन कंटाळा आला की कडधान्यांच्या उसळी  कराव्याश्या वाटतात. पण काही कडधान्य शिजायला खूप वेळ लागतो. त्यामुळे काहीजणी ते बनवायला कंटाळा करतात. फक्त १० मिनिटात कुकरमध्ये मुगाची उसळ कशी करायची ते या लेखात पाहूया. (Mugachi usal recipe sprouted moong usal recipe) यात तुम्ही आवडीनुसार टोमॅटो किंवा शेंगदाणे घालू शकता. (Food Recipes)

साहित्य:

हिरवा मूग - 1 कप

टोमॅटो - २ मध्यम आकाराचे

हिरवी मिरची - 6

लसूण पाकळ्या - 8

जिरा - १/२ चमचा

हल्दी - 1/2 टेबलस्पून

मीठ - चवीनुसार

कांदा - 1 मोठा

मिरपूड पावडर - 1/2 टेबलस्पून

लाल मिरची - २

मोहरी

कढीपत्ता

एक चिमूटभर हिंग

धणे - १ छोटा कप

कृती

सगळ्यात आधी कुकरमध्ये हिरवे मूग, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, जिरे, हळद, मीठ, ४ वाट्या पाणी घालून २-३ शिट्ट्या काढून घ्या.
नंतर टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची मिक्सरमध्ये काढून बारीक पेस्ट बनवा. 

उकडलेले मूग फोडून घ्या आणि टोमॅटोची पेस्ट घाला, उकळी आणून बाजूला ठेवा.

कढईमध्ये तेल, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, कांदा, हिंग आणि उकडलेले मूग घाला आणि उकळी आणा. आता मिरपूड, ताजी कोथिंबीर घाला.

ही गरमागरम स्वादिष्ट ग्रेव्ही चपाती, पुरी, डोसा इत्यादींसोबत सर्व्ह करू शकता.

Web Title: How to Make Mug Usal : Mugachi usal recipe sprouted moong usal recipe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.