कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी असे भज्यांचे वेगवेगळे प्रकार तुम्ही नक्कीच ऐकले असणार. पण पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यातही अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या अकलूज या गावात मात्र मर्डर भजी मिळतात. ती त्या भागातली एक प्रसिद्ध डिश आहे. नाव खूपच वेगळे आहे, पण ते असे का आहे हे तुम्हाला त्याची रेसिपी पाहून कळेलच (akluj famous murder bhaji). नेहमीच्या चवीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची आणि खाण्याची इच्छा असेल तर सध्याच्या रिमझिम पावसात ही गरमागरम मर्डर भजी एकदा खाऊन बघाच..(Marathi actress Rinku Rajguru's favorite murder bhaji)
अकलूजची प्रसिद्ध मर्डर भजी करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी भज्यांसाठी भिजवलेलं बेसन पीठ
१ वाटी उकडलेला बटाटा
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
वजन- शुगर वाढू नये म्हणून जेवताना कोणता पदार्थ कधी खावा? डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा खास सल्ला
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे
२ टेबलस्पून टोमॅटो सॉस
२ टेबलस्पून चिंच- गुळाचा कोळ
२ टीस्पून तिखट
चवीनुसार मीठ
भजी तळण्यासाठी तेल
कृती
सगळ्यात आधी उकडलेल्या बटाट्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि मीठ घालून ते कालवून घ्या.
त्यानंतर टोमॅटो सॉसमध्ये आणि चिंचगुळाच्या कोळात थोडं मीठ आणि थोडं लाल तिखट घाला आणि ते हलवून घ्या.
एका झटक्यात खोबरे करवंटीबाहेर येईल! बघा नारळ सोलण्याची सोपी ट्रिक- झटपट करा नारळीभात
आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये तेल टाका. तेल तापल्यानंतर बेसन पिठाचे भजे तळून घ्या.
आता तळलेली भजी एका डिशमध्ये काढा आणि चाकूने त्याचे मधोमध दोन काप करा.
आता या कापांमध्ये उकडलेला बटाटा भरा. त्याच्यावर कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो सॉस, चिंचगुळाचा कोळ टाका आणि ते सर्व्ह करा.