Lokmat Sakhi >Food > खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...

खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...

Muskmelon Seeds Shake : Kharbuja ke beej ka Healthy Milkshake : Summer Special Muskmelon seeds Milkshake : How To Make Muskmelon seeds Milkshake : खरबुजा एवढ्याच त्याच्या बियाही तितक्याच पौष्टिक असतात, बियांचे मिल्कशेक करण्याची रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 17:34 IST2025-04-15T17:23:07+5:302025-04-15T17:34:22+5:30

Muskmelon Seeds Shake : Kharbuja ke beej ka Healthy Milkshake : Summer Special Muskmelon seeds Milkshake : How To Make Muskmelon seeds Milkshake : खरबुजा एवढ्याच त्याच्या बियाही तितक्याच पौष्टिक असतात, बियांचे मिल्कशेक करण्याची रेसिपी...

How To Make Muskmelon seeds Milkshake Kharbuja ke beej ka Healthy Milkshake | खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...

खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...

उन्हाळा म्हटलं की टरबूज, खरबूज, ताडगोळे यांसारखी रसाळ फळं मोठ्या प्रमाणांत खाल्ली जातात. कडाक्याच्या रणरणत्या उन्हांत अशी रसाळ, गोड फळं खाल्ल्याने (Kharbuja ke beej ka Healthy Milkshake) शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. उन्हाळा संपेपर्यंत आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरी हमखास खरबूज आणलं जात. काहीजणांना खरबूज बियांसहित खाणे (Muskmelon Seeds Shake) पसंत असते तर काहीजण बिया काढून ( Summer Special Muskmelon seeds Milkshake) मगच ते खातात. परंतु खरबुजाच्या बिया काढून टाकण्यापेक्षा त्या खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते(How To Make Muskmelon seeds Milkshake).

कारण खरबुजा एवढ्याच त्याच्या बियाही तितक्याच पौष्टिक असतात. खरबूजमध्ये प्रथिने, कर्बोदके, पाणी, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम,सोडियम, विविध जीवनसत्त्वे, थायामिन इ. पोषक घटक असतात. खरबूजाच्या फळापासून त्याच्या बियांपर्यंत सर्व भाग आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात. यासाठीच खरबूज खाऊन त्याच्या बिया फेकून देण्याऐवजी तुम्ही त्या बियांचे मिल्कशेक देखील करु शकता. खरबूजाच्या बियांचे मिल्कशेक करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.  

साहित्य :- 

१. खरबूजाच्या बिया - २ कप 
२. दूध - १ कप 
३. बर्फाचे खडे - ३ ते ४ बर्फाचे खडे
४. साखर - १ ते २ टेबलस्पून 
५. व्हॅनिला इसेंन्स - २ ते ३ थेंब (पर्यायी)

उन्हाळ्यात घरीच करा मस्त ‘मँगो लस्सी!’ बाहेरच्या लस्सीने मुलांचा घसा बिघडण्याचाही धोका नाही...


शहाळ्याच्या पाण्यांत मिसळा ४ पदार्थ, पाण्याचे पोषणमूल्य वाढेल दुपटीने - उन्हाळ्यातही राहा फिट!

कृती :- 

१. सगळ्यात आधी खरबूज स्वच्छ धुवून ते व्यवस्थित कापून घ्यावे. 
२. खरबूजच्या बिया काढून एका वेगळ्या बाऊलमध्ये ठेवाव्यात. 
३. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात खरबुजाच्या बिया, दूध, बर्फाचे खडे, चवीनुसार साखर घालावी. 
४. सगळ्यात शेवटी यात आपण आपल्या आवडीप्रमाणे  व्हॅनिला इसेंन्सचे काही थेंब देखील घालू शकता. (पर्यायी)

५. आता मिक्सरचे झाकण लावून हे सगळे मिश्रण एकत्रित करुन मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. 
६. खरबुजाच्या बियांचे थंडगार मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे. मिक्सरच्या भांड्यातून हे मिल्कशेक एका ग्लासात ओतून घ्यावे. 

मिल्कशेकचा ग्लास भरल्यानंतर त्यावर ड्रायफ्रुट्सचे काप किंवा खरबुजाचे लहान तुकडे घालूंन पिण्यासाठी सर्व्ह करु शकतो.

Web Title: How To Make Muskmelon seeds Milkshake Kharbuja ke beej ka Healthy Milkshake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.