Join us  

नागपुरी तर्री पोहे घरीच करण्याची झणझणीत रेसिपी, चव अशी की खातच राहावे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2023 5:14 PM

How To Make Nagpur-Style Poha At Home एकदा ट्राय कराच नागपूर स्टाईल तर्री पोहे, घ्या स्पेशल रेसिपी

भारतीय संस्कृतीतील प्रत्येकाचा सर्वात आवडता नाश्ता म्हणजे पोहे. ७ जून हा दिवस 'जागतिक पोहे दिन' (International Poha Day) म्हणून साजरा करण्यात येतो. कांदा, टोमॅटो, मिरची, कडीपत्ता, शेंगदाणे, कोथिंबीरीची फोडणी देत हा भन्नाट पदार्थ केला जातो. पोह्याचे अनेक प्रकार केले जातात. प्रत्येक प्रदेशानुसार पोहे करण्याची पध्दती आणि चव वेगवेगळी आहे.

पोहे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कोकणी पोहे, अण्णा पोहे, तर्री पोहे, दडपे पोहे, इंदौरी पोहे, असे नऊ प्रकारचे पोहे आपल्याला खायला मिळतात. यातल्या प्रत्येक पोह्याची चव वेगळी आहे. आज आपण तर्री पोहे कसे तयार होतात हे पाहूयात. नागपूरमध्ये तर्री पोहे फार फेमस आहे. पोह्यांवर चण्याच्या उसळीचा लाल तर्रीदार रस्सा घेऊन खाल्ला जातो. नागपूरमध्ये गल्लोगल्ली ठेल्यावर हे पोहे विकायला असतात(How To Make Nagpur-Style Poha At Home).

तर्री पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य

पोहे

काळे चणे

कांदा

टमॉटो

बटाटा

तेल

हिरवी मिरची लसणाची पेस्ट

रव्यात अळ्या झाल्या? ४ उपाय, रव्यात अळ्या होणारच नाहीत, झालेल्या जातील पळून

सावजी मसाला

लाल तिखट

धणे पावडर

हळद

मीठ

पाणी

पोह्यांची कृती

सर्वप्रथम, पोहे भिजवून घ्या, आता कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बटाटा,  टमॉटो, हिरवी मिरची, कडीपत्ता, व हळद घालून मिश्रण मिक्स करा. आपण त्यात भाजलेले किंवा तळलेले शेंगदाणे देखील घालू शकता. आता त्यात भिजवलेले पोहे व चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. अशा प्रकारे फोडणीचे पोहे तयार.

तर्रीची कृती

गावरान चणे किंवा काळे चणे कुकरमधून उकडून घ्या. आता कढईत तेल घालून मोहरी, जिरे, आलं - लसूण - हिरवी मिरचीची पेस्ट घालून साहित्य तेलात भाजून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.  आता त्यात एक चमचा सावजी मसाला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, धणे पावडर घालून मिक्स करा.

ना डाळी भिजत घालण्याची झंझट, ना वाटण्याचं टेन्शन, २ कप रव्यामध्ये घरीच करा - क्रिस्पी रव्याचे मेदू वडे..

शेवटी टमॉटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. आता त्यात उकडलेले चणे घालून मिक्स करा. सर्व मसाला व चणे एकत्र मिक्स झाल्यानंतर त्यात पाणी घाला. व तर्रीला उकळी येऊ द्या. अशा प्रकारे तर्री रेडी.एका प्लेटमध्ये पोहे घ्या, त्यावरून तर्री रस्सा सर्व्ह करा. आपल्या आवडीनुसार आपण त्यात किसलेलं खोबरं देखील घालू शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स