राखी पौर्णिमा अगदी एक- दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. भावाला घरी बोलवायचं की तुम्ही त्याच्या घरी जायचं, याचं प्लॅनिंग झालेलं असणार. आपले बहिण- भाऊ, नवऱ्याचे बहिण भाऊ असं सगळं कुटूंब एकत्र येणार म्हटल्यावर जेवणाचा बेतही खास जमून यायला हवाच.. या दिवशी इतर स्वयंपाक काहीही असला तरी गोड पदार्थ मात्र अनेक घरांमध्ये एकसारखाच असतो. तो म्हणजे नारळी भात (sweet coconut rice). वर वर बघायला हा पदार्थ सोपा वाटत असला तरी थोडा ट्रिकी नक्कीच आहे. कारण त्यातलं पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण अचूक जमलं तर हा पदार्थ उत्तम होतो, नाहीतर बेत फसतो. म्हणूनच तर ही घ्या एक अचूक प्रमाण असलेली परफेक्ट रेसिपी (perect recipe of narali bhaat for rakhi pournima). ही रेसिपी मधुराज रेसिपी या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.
नारळी भात रेसिपी
साहित्य
२ टेबलस्पून तूप
तिशीनंतर महिलांच्या शरीरात होणारे ५ बदल देतात भविष्यातील आजारांचा इशारा, तब्येत बिघडण्यापूर्वी व्हा सावध
३ ते ४ लवंगा, २- ३ हिरव्या वेलची, दालचिनीचा छोटा तुकडा
१ कप खोवलेलं नारळ
१ कप साखर
१ कप तांदूळ घेऊन शिजवलेला भात
१० ते १२ केशराच्या काड्या
अर्धी वाटी दूध
काजू- बदामचे काप आणि मनुका असा सुकामेवा अर्धा कप.
रेसिपी
- सगळ्यात आधी कढईमध्ये २ टेबलस्पून तूप टाका. तूप गरम झालं की त्यात लवंगा, वेलची, दालचिनी टाकून ते परतून घ्या.
- हे पदार्थ परतून झाले की त्यात खोवलेलं नारळं टाका आणि ३ ते ४ मिनिटे परतून घ्या.
- नंतर साखर टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या.
आळशीपणा न करता फक्त १ चमचा आळशीचा करा सोपा उपाय, केस वाढतील जोमात, होतील सिल्की
- त्यानंतर त्यात बदाम आणि काजूचे काप तसेच मनुका टाका.
- आता त्यात शिजवलेला भात टाका.
- त्यावर केशराचं दूध घाला. १० ते १२ केशराच्या काड्या दुधात भिजवून हे दूध तयार करून घ्यावं.
- हलक्या हाताने सगळं मिश्रण हलवा. भाताची शितं मोडणार नाहीत, याची काळजी घ्या.
- कढईवर झाकण ठेवा, ५ ते ७ मिनिटे कमी गॅसवर वाफ येऊ द्या. मस्त सुगंधित, उत्तम चवीचा आणि मोकळा- मोकळा नारळी भात झाला तयार.
भात मोकळा शिजण्यासाठी टिप्स
भात मोकळा शिजावा यासाठी तांदूळ १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा. त्यानंतर कुकरमध्ये तांदूळ आणि त्याच्या दुप्पट पाणी टाकावं. उदा. १ वाटी तांदूळ असेल तर २ वाट्या पाणी टाका. त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि अर्धा टेबलस्पून तेल टाकून शिजवल्यास तांदूळ अधिक मोकळा शिजतो. सुरुवातीला गॅस मोठा ठेवावा. पाण्याला उकळी येऊन तांदळाचे दाणे त्यात मोकळे नाचू लागतील. नंतर हळूहळू तांदळाची कुकरमधली हालचाल कमी झाली की गॅस मध्यम करा सगळं मिश्रण एकदा चमच्याने हळूवार हलवा आणि नंतर त्यावर झाकण ठेवून द्या. शिट्टी लावू नका. नुसते अधर झाकण ठेवून द्या. पुढच्या ५ ते ६ मिनिटांत भात शिजेल आणि तो अगदी मोकळा असेल. मात्र यावेळी गॅस मंद असावा.