Lokmat Sakhi >Food > गचका, आसट झालेला नारळीभात आवडत नाही? ४ टिप्स बघा, भात होईल एकदम मोकळा- चवदार

गचका, आसट झालेला नारळीभात आवडत नाही? ४ टिप्स बघा, भात होईल एकदम मोकळा- चवदार

How To Make Naralibhat For Rakshabandhan 2024: राखीपौर्णिमेसाठी अगदी दाणा- दाणा मोकळा दिसणारा नारळीभात करणार असाल तर या काही टिप्स लक्षात ठेवा... (perfect recipe of making narali bhat)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 05:11 PM2024-08-17T17:11:09+5:302024-08-17T17:12:13+5:30

How To Make Naralibhat For Rakshabandhan 2024: राखीपौर्णिमेसाठी अगदी दाणा- दाणा मोकळा दिसणारा नारळीभात करणार असाल तर या काही टिप्स लक्षात ठेवा... (perfect recipe of making narali bhat)

how to make naralibhat for rakshabandhan 2024, perfect recipe of making narali bhat, simple and easy recipe of making non sticky narali bhat | गचका, आसट झालेला नारळीभात आवडत नाही? ४ टिप्स बघा, भात होईल एकदम मोकळा- चवदार

गचका, आसट झालेला नारळीभात आवडत नाही? ४ टिप्स बघा, भात होईल एकदम मोकळा- चवदार

Highlightsकाही लोकांना अगदी तांदाळाचा दाणा दाणा सुटा, मोकळा असणारा नारळीभात आवडतो.

राखीपौेर्णिमेच्या दिवशी नारळीभाताचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे इतर कोणताही गोड पदार्थ त्या दिवशी केला तरी थोडा का असेना पण नारळीभात केला जातोच (how to make naralibhat for rakshabandhan 2024?) एरवी आपण वर्षभर तो पदार्थ करत नाही. त्यामुळे मग याच सणाच्या निमित्ताने करायचा म्हटलं तर थोडं दडपण येतं आणि त्यातच नेमकं भातात पाणी जास्त पडतं किंवा काहीतरी प्रमाण हुकतं (perfect recipe of making narali bhat). मग तो अगदीच गचका, आसट किंवा चिकट होऊन जातो. असं होऊ नये म्हणून नारळीभात करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते पाहा...(simple and easy recipe of making non sticky narali bhat)

 

नारळीभात मोकळा कसा करावा?

नारळीभात करण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेेत. यापैकी पहिली पद्धत म्हणजे तांदूळ आणि इतर पदार्थ कुकरमध्ये टाकून एकत्रच शिजवले जातात. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये भात आधी वेगळा शिजवून घेतला जातो आणि नंतर तो बाकीच्या पदार्थांसोबत मिक्स केला जातो. 

राखीपौर्णिमा स्पेशल: पार्लरसाठी वेळच नाही? ३ पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावा; मिळेल फेशियलसारखा इंस्टंट ग्लो

पहिल्या पद्धतीनुसार नारळीभात केला तर तो बऱ्याचदा गचका, आसट, चिकट होतो. असा भातही काही लोकांना आवडतो. पण काही लोकांना अगदी तांदाळाचा दाणा दाणा सुटा, मोकळा असणारा नारळीभात आवडतो. तुम्हालाही अशाच पद्धतीचा मोकळा नारळीभात करायचा असेल तर त्यासाठी तांदूळ शिजवून घेताना काय करावं ते पाहा.

 

नारळीभात मोकळा होण्यासाठी तांदूळ कसा शिजवावा?

१. तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. यासाठी शक्यतो बासमती तांदूळच वापरावा.

२. आता जेवढा तांदूळ घेतला असेल त्याच्या दुप्पट पाणी पातेल्यात किंवा कढईमध्ये टाका. त्या पाण्यात एखाद्या लिंबाचा रस, एक चमचा मीठ आणि १ चमचा तेल टाका. 

लंचब्रेकनंतर ऑफिसमध्ये खूप सुस्ती येते- कामं सुचत नाहीत? ५ गोष्टी करा- दिवसभर फ्रेश वाटेल 

३. पाण्याला उकळी आली की त्यात तांदूळ टाका. गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर राहू द्या.

४. त्यानंतर तांदूळ शिजू लागला की गॅस बंद करा. साधारण ८० टक्के तांदूळ शिजला की गॅस बंद करा आणि उरलेलं पाणी गाळून घ्या. 

५. आता अशा पद्धतीने शिजलेला भात तुम्ही नारळीभातासाठी जे काही मिश्रण कढईमध्ये तयार केलं असेल त्यात घाला आणि झाकण ठेवून वाफ येऊ द्या. म्हणजे भात पुर्णपणे शिजून जाईल आणि  नारळीभात छान मोकळा होईल.  

 

Web Title: how to make naralibhat for rakshabandhan 2024, perfect recipe of making narali bhat, simple and easy recipe of making non sticky narali bhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.