गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे. काही ठिकाणी डेकोरेशनची लगबग सुरु आहे. तर काही गृहिणी बाप्पांना आवडणारे पदार्थ करण्यासाठी पूर्व तयारी करीत आहे. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या पदार्थांपैकी एक म्हणजे मोदक. बाजारात अनेक प्रकारचे मोदक मिळतात. सध्या उकडीचे आणि तळणीचे मोदक व्यतिरिक्त, बाजारात चॉकलेट, रेनबो, काजू, मावा इत्यादी प्रकारचे मोदक मिळतात.
आज आपण ओल्या खोबऱ्याचे मोदक कसे तयार करायचे हे पाहूयात. ओल्या खोबऱ्याचे मोदक झटपट तयार होतात. त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. यासह हे मोदक आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. बाप्पाला गोड पदार्थाचा नैवद्य म्हणून आपण ओल्या खोबऱ्याचे मोदक तयार करू शकतात(How to Make Nariyal Modak Recipe at Home).
ओल्या खोबऱ्याचे मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य
खोबरं
दूध
साखर
कुकरमध्ये कोण तूप कढवते, ते ही शिट्टी लावून? पाहा भन्नाट ट्रिक, करा रवाळ झटपट तूप
मिल्क पावडर
तूप
वेलची पावडर
केसर
कृती
सर्वप्रथम, ओल्या खोबऱ्याचे बारीक काप करून घ्या, व हे काप मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्या. खोबरं जास्त बारीक करू नये. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात मिक्सरमधून वाटून घेतलेलं खोबरं घाला, व खरपूस भाजून घ्या. नंतर त्यात एक कप दूध, एक कप साखर, एक कप मिल्क पावडर आणि २ चमचे तूप घालून साहित्य एकजीव करा. त्यानंतर त्यात अर्धा चमचा वेलची पूड, आणि केसर घालून मिक्स करा. मिश्रण मध्यम आचेवर चमच्याने सतत ढवळत राहा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा.
अळूवडी - कोथिंबीर वडी नेहमीचीच, आठवडाभर टिकतील अशा कोबीची खमंग वडी करण्याची सोपी कृती पाहा
मोदक तयार करण्याचा साचा घ्या. त्याला आतून तूप लावून ग्रीस करा. त्यानंतर त्यात हाताने गरम असतानाच खोबऱ्याचं तयार मिश्रण भरून मोदकाचा आकार द्या. त्यानंतर साचा अलगद उघडा, व मोदक हलक्या हाताने साच्यातून बाहेर काढा. आपण त्यात ड्रायफ्रुट्स देखील मिक्स करू शकता. अशा प्रकारे ओल्या खोबऱ्याचे मोदक रेडी.