तांदूळ (Rice) हे भारतीय लोकांचा मुख्य आहार आहे. वरण भात खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्णच होत नाही. अनेक घरांमध्ये दिवस रात्र भात बनतो. काहीजण वजन वाढण्याच्या भितीने भात खात नाहीत पण दिवसातून एकवेळ तरी मन भरून भात खातात. (How To Make Non Sticky) रोजच्या खाण्यातला भाग असला तरी बरेच लोक भात बनवण्यात फेल होतात. कधी भात जास्त गचका होतो, गचगचीत होतो तर कधी कुकरला चिकटतो. फरफेक्ट भात बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही. (How To Make Rice Dry And Fluffy Easy Tips Cooking Hacks)
भात ओलसर किंवा चिकट बनतो तर कधी कच्चा राहून जातो. मऊ-मोकळा भात बनवणंसुद्धा एक कला आहे कमी भात आणि जास्त पाणी घेतलं तर तांदूळ चिकट, ओलसर राहतो आणि कमी पाणी घातलं तर भांड्याला चिकटतो. मऊ-मोकळा भात कसा शिजवायचा यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.
द मॉम100.कॉमच्या रिपोर्टनुसार भात शिजवण्यासाठी भिजवून ठेवल्यास त्याचा अधिक फायदा होतो. 2 कप तांदूळासाठी 1 कप पाणी पुरेसे होते. पाणी उकळवून त्यात थोडं मीठ घाला नंतर तांदूळ घाला. 1 कप भात शिजायला जवळपास 17 मिनिटांचा कालावधी लागतो. शिजवलेला भात तुम्ही 5 दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेवू शकता.
तांदूळ मऊ-मोकळे शिजण्यासाठी टिप्स
जर तांदूळ फ्लफी आणि मोकळे शिजावे असं वाटत असेल तर पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी स्वंयपाक करताना बासमती तांदूळांची निवड करा. हे तांदूळ व्यवस्थित फुलतात. आधी तांदूळ ४ ते ५ वेळा पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्या. ज्यामुळे त्यातील स्टार्च निघून जाईल. स्टार्चमुळे तांदूळ चिकट, चिपचिपीत बनतो. एका स्वच्छ पाण्याच्या भांड्यात ३० मिनिटांसाठी तांदूळ भिजवून ठेवा. यामुळे तांदूळ पाणी शोषून घेऊन आणि व्यवस्थित फुलतील. नंतर मोठा कुकर किंवा भांड्यात पाणी घाला.
भातापेक्षा चारपट जास्त पाणी असावं त्यात अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तेल आणि लिंबाचे काही तुकडे घाला. लिंबू घातल्यानं तांदूळ पांढरेशुभ्र होतील आणि तेल घातल्यानं तांदूळ एकमेकांना चिकटणार नाहीत. मीठ घातल्यानं तांदूळात फ्लेवर्स येतील.
नारळ फोडण्याचं कठीण काम होईल सोपं; १ मिनिटांत नारळ फुटून खोबरं हातात- २ भन्नाट ट्रिक्स
नंतर धुतलेले तांदूळ उकळत्या पाण्यात घाला. २ मिनिटांनंतर ९० टक्के तांदूळ शिजेल नंतर गॅस बंद करा. नंतर एका मोठ्या ताटाला तेल लावून ठेवा त्यात तांदूळ पसरवून ठेवून थंड होऊ द्या. यात तुम्ही जीऱ्याची फोडणीसुद्धा घालू शकता, तयार आहेत मोकळा, न चिकटणारा भात