Lokmat Sakhi >Food > साबुदाणा खिचडी कधी चिकट कधी खूप कडक होते? १ ट्रिक, मऊ-मोकळी मस्त होईल खिचडी

साबुदाणा खिचडी कधी चिकट कधी खूप कडक होते? १ ट्रिक, मऊ-मोकळी मस्त होईल खिचडी

How To Make Non Sticky Subudana Khichdi Recipe For Fast : खिचडी (Khichdi) हा उपवासासाठी उत्तम आहार असूनखिच डी खाल्ल्याने शरीर एनर्जेटिक राहतं आणि बराचवेळ भूकही लागत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:14 PM2024-08-05T16:14:52+5:302024-08-05T17:09:00+5:30

How To Make Non Sticky Subudana Khichdi Recipe For Fast : खिचडी (Khichdi) हा उपवासासाठी उत्तम आहार असूनखिच डी खाल्ल्याने शरीर एनर्जेटिक राहतं आणि बराचवेळ भूकही लागत नाही.

How To Make Non Sticky Subudana Khichdi Recipe For Fast How To Make Pefect Sabudana Khichdi | साबुदाणा खिचडी कधी चिकट कधी खूप कडक होते? १ ट्रिक, मऊ-मोकळी मस्त होईल खिचडी

साबुदाणा खिचडी कधी चिकट कधी खूप कडक होते? १ ट्रिक, मऊ-मोकळी मस्त होईल खिचडी

श्रावण (Shravan) महिन्याला सुरूवात झाली असून आता घरोघरी उपवासाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू आहे. श्रावण सोमवारच्या उपवासाला साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा बनवला जातो. खिचडी हा उपवासासाठी आहार. खिचडी खाल्ल्याने शरीर एनर्जेटिक राहतं आणि बराचवेळ भूकही लागत नाही.  (How To Make Non Sticky Subudana Khichdi Recipe For Fast) 

ज्या लोकांना साबुदाण्याची खिचडी खायला आवडते त्यांची तक्रार असते की घरी केलेली साबुदाण्याची खिचडी चिकट किंवा गचकी बनते. मोत्यासारखी मऊ-मोकळी खिचडी बनवण्यासाठी काही कुकिंग ट्रिक्स वापराव्या लागतील. (How To Make Pefect Sabudana Khichdi)

१) साबुदाणा खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी १ कप जाड साबुदाणे घ्या. ज्यामुळे खिचडी टेस्टी बनते. साबुदाणा पाण्याने धुवून घ्या. हाताने चोळून धुतल्याने साबुदाण्यावरचा पांढरा थर निघून जाईल. साबुदाणे २ ते ३ वेळा धुवून घ्या. 

चपात्या तव्यावरून काढताच कडक-वातड होतात? कणकेत 'हा' पदार्थ मिसळा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

२) साबुदाणे १/४  कप पाण्यात ३ ते ४ तासांसाठी भिजवायला ठेवा. साबुदाण्यांमध्ये इतकंच पाणी घाला जितकं ते पाणी शोषून घेईल. साबुदाण्यामध्ये १ बोट बुडेल इतकं पाणी घाला. साबुदाणा चमच्याने १ ते २ वेळा ढवळून घ्या. जेणेकरून साबुदाणे व्यवस्थित  भिजतील. 

३) एका कढईमध्ये १ चमचा तूप घाला आणि थोडे शेंगदाणे घालून हलकं फ्राय करून घ्या. कढईत २ चमचे तूप घाला त्यानंतर गरम झाल्यानंतर यात जीरं घाला. नंतर यात २ हिरव्या मिरच्या आणि १ उकडलेला बटाटा चिरून घाला. सर्व जिन्नस शिजल्यानंतर यात साबुदाणे आणि दाण्याचं कुट घाला.

४) खिचडीमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार टोमॅटो घालू शकता. टोमॅटो घालायचा असेल तर बटाटे शिजल्यानंतर घाला.  . 

वजन वाढलंय-व्यायामानेही कमी होईना? आहारतज्ज्ञ सांगतात २१ दिवसांत ४ किलो घटवण्याचं खास डाएट

५) साबुदाण्याची खिचडी बनून तयार आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. जर तुम्ही टोमॅटो घातला नसेल तर एक लिंबू पिळून घाला. दाणेदार, चविष्ट साबुदाण्यांची खिचडी बनून तयार आहे. ही खिचडी तुम्ही शेंगदाणे  घालून सर्व्ह करू शकता.

साबुदाणा भिजवण्याची घाई करूनका

काही लोक जेवण बनवताना घाई करतात. साबुदाणा भिजवल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी खिचडी बनवायला घेतात. असं केल्याने साबुदाणा खिचडी नेहमी चिकट बनेल. साबुदाणे पाण्यात धुवून घ्या त्यानंतर ४ ते ५ तास भिजवायला ठेवा. त्यानंतर गाळणीच्या मदतीने त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.  साबुदाणा १५ ते २० मिनिटं गाळणीत राहू द्या. यामुळे साबुदाण्यातील पाणी सहज निघून जाईल. 

Web Title: How To Make Non Sticky Subudana Khichdi Recipe For Fast How To Make Pefect Sabudana Khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.